विदूषकाचे हे डोळे
किती किती बोलके
दोरीवरी खेळताना
हाताचे इशारे म्होरके
अंगरखा पुराणा
वरी नक्षी कोरलेली
रंगांच्या बुट्टीने
चेहरा झाकलेला
उडया मारताना
श्वासांचीच दाटी
टोपी हाले आणि
गोंडे बेरकी
घामाने चिंब, दुखले
शरीर जरीही
सुखाचीच टोपी
दुसर्याच्या शिरी
हसणे एकाचे अन्
रडणे दुसर्याचे
जगाची अशीही
रीत बेगडी
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.