सिंह आणि अस्वलाची गोष्ट
पुर्वीच्या काळी चंद्रवंशात नंद नावाचा एक राजा होता राज्याच्या कारभार आपल्या मुलावर सोपवला व तो वानप्रस्थाश्रमात गेला. तेथून संन्यासी बनुन त्याने जंगलात कठिण अशी तपश्चर्या करायला सुरवात केली. चंद्रगुप्त नांवाच्या त्याच्या मुलाने सुद्धा उत्तम प्रकारे राज्य कारभार पहाण्यास सुरवात केली.एकदा राजा चंद्रगुप्त शिकार करण्यासाठी म्हणुन अरण्यात गेलां. शिकार मिळते कां पहात पहात तो खूप दूर जंगलात जाऊन पोहोचला. त्याची सेना पाठीमागेच राहिली. सूर्यास्त झाला व सगळीकडे काळोख पडु लागला. त्याच्या शूरपणाने त्यांने ती रात्र झाडाच्या फांदीवरच काढण्याचे ठरवले.
अर्ध्या रात्री त्याला सिंहाची गर्जना एकू येऊ लागली. धावत असलेल्या एका अस्वलाचा एक सिंह पाठलाग करत असतांना त्यांने पाहिला. शेवटी राजा ज्या फांदीवर बसला होता त्याच फांदीवर ते अस्वल चढू लागले.
राजाला माहित होते की, तो सिंह झाडावर चढू शकणार नाही तरी त्याला थोडी भिती वाटू लागली. त्याचे सारे अंग घामाने भरुन आले. रात्रभर कांपत तो तेथेच बसुन राहिला. तेव्हां ते अस्वल जेथे राजा बसला होता तेथे चढुन आले. अस्वलाने राजाची अशांती ओळखली त्यांनी राजाला धीर दिला त्यांनी त्याला सांगीतले, “ राजा घाबरु नकोस मी सिंहावर पहारा देत येथेच थांबतो तोपर्यंत तु झोप, काळजी करु नकोस सिंह वर चढून येणार नाही. तुझी झोप झाल्यावर मी झोपेन तुला पसंद आहे? राजानी ह्याच्या आधी कुणालाही जनावराला बोलतानां पाहिले नव्हते. तेव्हां राजानी बोलण्यात काहीतरी तथ्य आहे हे जाणुन त्याने त्याला समंती दिली. तेव्हां खालून सिंह जोरात गर्जना करुन म्हणाला, “ अरे अस्वला, तु बुद्धिहीन आहेस. ह्या राजाने दिवसभर आपल्या सारख्याना मारण्यात घालवला. माणुसच सर्वात निर्दयी व क्रुर असतो. तरी त्याला खाली पाड, मी त्याला खाऊन निघुन जाईन. तुला खाणार नाही. तुला तुझा रस्ता मोकळा.
परंतु अस्वलाने त्याचे ऐकले नाही. त्यांने सिंहाला सांगितले, “ हे सिंहा मी ह्या राजाला वचन दिले आहे. तरी मी माझे वचन मोडणार नाही. मी त्याला धोका देणार नाही. जसे असेल तसे मी माझ्या वचनाचे पालन करीन.
तेव्हां सिंह गर्जना करीत तेथेच बसुन राहिला. राजा झोपी गेला. अस्वल अर्धी रात्र जागत बसला. नंतर राजा जागा झाल्यावर झोपी गेला.
अस्वल झोपल्याबरोबर सिंहाने राजाला सांगीतले, हे राजा माणुस जरुर भासली की दुसर्याला धोका देतो. हा अस्वल माझ्यासारखाच भुकेला आहे. मी जोपर्यंत येथे आहे तोपर्यंत तो तुम्हाला वचन पाळण्याचे आमिष दाखवेल. मी निघून गेलो की, तो तुम्हाला खाऊन टाकील. तरी तुम्ही त्याला खाली ढकलून द्या. मी त्याला खाऊन माझ्या वाटेने निघुन जाईन, तुम्हाला माहितच आहे. सिंह भूकेला नसला तर कोणाची हत्या करीत नाही. जेव्हां मी त्याला खाईन तेव्हां तुम्हाला भिण्याचे कारण नाही. ”
तेव्हां राजा काहीच विचार करु शकला नाही. परंतु त्याला सिंहाचे म्हणणे पटले. परंतु तोपर्यंत अस्वल त्याचा मित्र बनुन राहिला. परंतु तो सुद्धा जनावरच आहे. त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा.
सिंहाला राजाच्या मनांतली शंका कळली त्यांने राजाला सांगितले, “ राजा तु स्वतःचे रक्षण कर. जर अस्वल जागे झाले. तर सर्व नाश होईल व पश्चाताप करण्याची पाळी येईल. म्हणून विश्वास न ठेवता त्याला खाली पाड.
राजानी सिंहावर विश्वास ठेवून अस्वलाला खाली ढकलले परंतु अस्वलांनी पडता पडता एक फांदी पकडली. तेव्हां पूर्वेला सूर्यकिरण दिसु लागले. सिंह हा यक्षाच्या रुपाने व अस्वल तपस्वीच्या रुपात दिसु लागले. तेव्हां हसुन तपस्यानी यक्षाला सांगितले हे पहा माझा जय झाला. मी एका दासाल पकडले तेव्हां मी मुक्त झालो. तेव्हां हे म्हणताच यक्ष अदृश्य झाला. तपस्यानी राजाला तुला वेड लागेल म्हणून शाप दिला.
राजा वेडा होऊन अरण्यात भटकू लागला. काही कारणाशिवाय हंसत राहिला. राजाच्या मंत्रयानी त्याचा शोध लावला. त्याचा मंत्री सत्यवादी व बुद्धीशाली होता. बर्याच दिवसानंतर त्यानी आपल्या राजाला ओळखले परंतु राजानी आपल्या मंत्रयला ओळखले नाही. शेवटी कसेतरी त्यांनी राजाला महांलांत आंणले.
ठिकठिकाणाहून हकीम वैद्य आले. देशापरदेशातून मांत्रिक आले पण कोणाचाच इलाज चालेना शेवटी मंत्रयानी राजाला त्यांच्या वडिलांकडे नंदाकडे नेले. नंदाने त्याला जयमुनीच्या जवळ नेले. जयमुनी वेड्या राजाला बराच वेळ पहात राहिले. नंतर त्यांनी नदला सांगितले, “ राजा काष्ठऋषीसारखा कृतघ्न बनला, तेव्हां काष्ठमुनीनी आपल्या मुलाला अभिशाप दिला. तुम्ही राजाला घेऊन वेंकटाद्रि पहाडावर घेऊन चला. स्वामी पुष्करिणीत स्नान करुन देवाचे दर्शन घेतल्यावर तो पूर्वीसारखा चांगला होईल ” तेव्हां नंदाने आपल्या मुलाला चंद्रगुप्ताला वेंकटाद्रि पहाडावर नेले. तेथे तीन दिवस पुष्कणात स्नान करुन चंद्रगुप्तराजा पूर्वी सारखा चांगला झाला व राज्य करुन श्रीनिवासाच्या चरणकमलावर डोके ठेवून मोक्षाप्रत गेला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.