जवळजवळ प्रत्येक माणसाला मनात क्वचित का होईना एक प्रश्न नेहमी पडतो कि आपली उत्पत्ती कशी झाली? जर आपण आपल्या पुस्तकांचे शास्त्रीय विश्लेषण केले तर आपल्याला नक्कीच त्याचे उत्तर मिळेल. हिंदू धर्माची सुरुवात शिवापासून होते. पण मग शिव कोण आहे? तो देव आहे का? आणि जर आहे तर शिवाची उत्पत्ती कशी झाली? आपले धर्मग्रंथ आपल्याला त्याचे उत्तरही देतात.
एकदा एका साधूने शिवाला विचारले, “तुझा पिता कोण?” शिवाने “ब्रह्मदेव” असे उत्तर दिले, साधूने पुन्हा प्रश्न विचारला, “मग तुझा आजोबा कोण आहे?” शिवाने उत्तर दिले “विष्णू”, साधू म्हणाला “मग तुझे पणजोबा कोण आहेत?” शिव म्हणाला “मी स्वत:”
या कथेवरून आपण असा अंदाज लावू शकतो की हे एक असे चक्र आहे ज्यामध्ये प्रारंभ किंवा अंत नाही किंवा असे म्हणू शकतो की ज्यामध्ये शिव हाच आरंभ आहे आणि शिव हाच शेवट आहे. त्यामुळे या जगाच्या निर्मितीपूर्वीही शिव अस्तित्वात होता असे मानायचे का? आणि उत्तर होय असेल तर शिव शाश्वत आणि निराकार आहे का?