महाराज दशरथानें श्री रामचंद्राच्या राज्याभिषेकाचा दिवस निश्चित ठरविला. अयोध्या नगरी आनंद सागरांत बुडून गेली. अयोध्यावासी उत्साहाने राज्याभिषेकाच्या तयारीला लागले. सिंहासन तयार झाले. छत्र चामर तयार झाले. सुवर्ण कलश तयार झाले. अशा या मंगल प्रसंगी लोकरंजनार्थ अभिनय कलावंतांना नाट्य प्रयोग करण्याची आज्ञा दिली होती. अवदातिका नांवाच्या सीतेच्या एका दासीन रेवा देवीजवळ अशोक वृक्षाची एक शाखा मागितली. आणि पुढे काय घडले सीतेच्या आणि रामाच्या आयुष्यात याची हि कथा आहे..!!