भिक्षु:- हे नागः(शूर) हा सत्य बोलण्याचा प्रसंग आहे. येथें घडलेली गोष्ट सांगितली पाहिजे. मी तुला आतां प्रश्न विचारणार आहें. जें असेल तें आहे, असें सांगितलें पाहिजे. जें नसेल तें नाहीं ह्मणून सांगितलें पाहिजे. पुढील रोग तुला आहेत काय? कुष्टरोग तुला आहेत काय?

उमेदवार:- नाहीं महाराज. (नत्थि भन्ते.)
भिक्षु:-गंडरोग ?
उ०: नाहीं महाराज.
भिक्षु:- किलास रोग ?
उ०:- नाहीं महाराज.
भिक्षु:- क्षयरोग ?
०:- नाहीं महाराज.
भिक्षु:- अपस्मार ?
उ०: नाहीं महाराज.
भिक्षु:- तूं मनुष्य आहेसना ?
उ०:- होय महाराज.(आम भन्ते)
भिक्षु:- तूं पुरूष आहेसना ?
उ०:- होय महाराज.
भिक्षु:- तूं स्वतंत्र आहेसना ?
०:- होय महाराज.
भिक्षु:- तूं ऋणमुक्त आहेसना ?
०:- होय महाराज.
भिक्षु:- तूं राजाचा योद्धा नाहींस ना ?
उ०:
- होय महाराज.(मी राजाचा योद्धा नाहीं.)
भिक्षु:- आईबापांची तुला परवागी आहेना ?
उ०:- होय महाराज.
भिक्षु:- तुझ्या वयाला वीस वर्षें पुरीं झालीं आहेतना ?
उ०:- होय महाराज.
भिक्षु:- तुला लागणारें पात्र आणि चीवरें तुझ्या जवळ आहेतना ?
उ०:- होय महाराज.
भिक्षु:- तुझें नांव काय ?
उ०: अमुक.
भिक्षु:- तुझा उपाध्याय कोण ?
उ०:- अमुक.

ह्या प्रश्नांचीं वर सांगितल्याप्रमाणें यथायोग्य उत्तरें दिल्यावर तो संघाला त्रिवार विनंति करितो कीं, हा उमेदवार उपसंपदेला अंतराय करणार्‍या गोष्टींपासून मोकळा आहे, याला लागणारें पात्र व चीवरें याजपाशीं आहेत. आतां हा उपसंपदेची याचना करीत आहे. याचा उपाध्याय अमुक. जर संघाला योग्य वाटत असेल तर संघानें यास उपसंपदा द्यावी. ज्याला योग्य वाटत असेल त्यानें मुकाट्यानें रहावें, ज्याला योग्य वाटत नसेल त्यानें बोलावें. सगळा संघ मुकाट्यानें राहिला ह्मणजे तो ह्मणतोकीं:- संघाला ही गोष्ट मान्य आहे. ह्मणून संघ मुकाट्यानें आहे, असें मी समजतों.

नंतर त्या उमेदवारास आपली छाया पावलांनी मोजायास १सांगतात; त्याला ऋतु, मास वगैरे सांगतात; आणि पुढील चार आधार ( अबलंबू राहण्या सारख्या गोष्टी) सांगण्यांत येतात.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(१- पूर्वीं आपली छाया मोजून वेळ समजत असत.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
भिक्षु:-“भिक्षान्नावर अवलंबून राहण्यासाठीं तुझा हा संन्यास; ह्मणुन यावज्जीन भिक्षान्नावर अवलंबून राहण्याचा तूं प्रयत्न केला पाहिजे. संघदानादिक प्रसंगीं मिळालेलें अन्न विशेष लाभ, असें तूं समजावें.”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel