इत्थिं सोंण्डि विकिंरणि पुरिसं वापि तदिसं |
इस्सरियास्मिं ठापेति, तं पराभवतो मुखं ||२२||


दुर्व्यसनी आणि उधळ्या स्त्रीला किंवा तशाच पुरुषाला जो अधिकाराच्या जागेवर नेमतो | तें (त्याच्या) पराभवाचें कारण होय ||२२||

इति हेतं विजानाम, एकादसमो सो पराभवो |
द्वादसमं भगवा ब्रहि, किं पराभवतो मुखं ||२३||


हा अकरावा पराभव आम्हांस समजला | भगवन् बारावें पराभवाचें कारण कोणतें तें सांग ||२३||

अप्पभोगो महातण्हो खत्तिये जातये कुले |
सोध रज्जं पत्थयति, तं पराभवतो मुखं ||२४||


क्षत्रिय कुळांत जन्मलेला गरीब मनुष्य मोठी हांव धरितो व राज्य मिळवूं पाहतो | तें (त्याच्या) पराभवाचें कारण होय ||२४||

एते पराभवे लोके पण्डितो समवेक्खिय |
अरियो दस्सनसम्पन्नो स लोकं भजते सिवं ति ||२५||


शहाणा तत्त्वज्ञानसंपन्न आर्य हे पराभव जाणून कल्याणप्रद लोकाला जातो ||२५||

|| पराभवसुत्तं निट्ठितं ||
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to लघुपाठ