दुश्चरिते व सुचरिते
येथे वर दिलेली दुश्चरिते आणि सुचरिते कोणती याचे थोडक्यात विवेचन करणे योग्य वाटते. भगवान सालेय्यक ब्राह्मणांना म्हणतो, “गृहस्थो, कायेने घडणारे तीन प्रकारचे अधर्मारचण कोणते? एखादा मनुष्य प्राणघात करतो, रुद्र धारण, लोहितपाणि आणि मारहाण करण्यामध्ये गुंतलेला असतो; अथवा चोरी करतो, जी वस्तू आपली नव्हे तो—गावात किंवा अरण्यात असो— मालकाला न विचारता घेतो, किंवा व्यभिचार आचरतो, आई, बाप, भगिनी, पति किंवा आप्त यांनी रक्षण केलेल्या स्त्रीशी व्यभिचार करतो याप्रमाणे कायेने विविध अधर्मारचण घडते.
“आणि, गृहस्थहो वाचेने घडणारे चार प्रकारचे अधर्माचरण कोणते? एखादा मनुष्य खोटे बोलतो. सभेत परिषदेत, आप्तमंडळात किंवा राजद्वारी गेला असता त्याची साक्ष विचारतात, तुला जे माहित असेल ते सांग. तो जे जाणवत नाही ते मी जाणतो, जे पाहिले नाही ते मी पाहिले, असे सांगतो. ह्याप्रमाणे स्वत:साठी परक्यासाठी कां थोड्याबहुत प्राप्तीसाठी जाणूनबुजून खोटे बोलतो. अथवा तो चहाडी करतो, ह्या लोकांचे ऐकून त्या लोकांत भेद पाडण्यासाठी कांगाळ्या सांगतो किंवा त्या लोकांचे ऐकून ह्या लोकांत विरोध उत्पन्न करण्यासाठी यांना येऊन सांगतो. याप्रमाणे एकोप्याने वागणार्यात भेद पाडतो किंवा भांडणार्यांना उत्तेजन देतो. भांडण वाढविण्यात त्याला आनंद वाटतो, भांडण वाढविणारे वचनच तो बोलत असतो. अथवा तो शिवीगाळ करतो, दुष्टपणाने भरलेले, कर्कश, कटू, वर्मी लागणारे, क्रोधयुक्त आणि समाधानाचा भंग करणारे वचन बोलतो अथवा तो वृथा बडबड करतो, भलत्याच वेळी बोलतो, न घडलेल्या गोष्टी रचून सांगतो. अधार्मिक, शिष्टाचाराविरुद्ध दुर्लक्ष करण्यात योग्य, प्रसंगाला न शोभणारे, अकारण पाल्हाळीक आणि अनर्थक भाषण करतो. याप्रमाणे वाचेने चतुर्विध अधर्माचरण घडते.
“आणि गृहस्थहो, तीन प्रकारचे मानसिक अधर्माचरण कोणते?” एखाद मनुष्य दुसर्याच्या द्रव्याचे चिंतन करतो, दुसर्याच्या संपत्तीची साधने आपणाला मिळावी. असे इच्छितो अथवा तो द्वेषबुद्धि असतो; हे प्राणी मारले जावोत, नाश पावोत, असा विचार करतो, अथवा मिथ्यादृष्टि होतो, दान नाही, धर्म नाही, सुकृतदुष्कृत कर्माचे फळ नाही, हा श्लोक नाही, परलोक नाही, अशा प्रकारचे नास्तिक विचार बाळगतो, याप्रमाणे मनाने त्रिविध धर्माचरण घडते.
“गृहस्थहो, तीन प्रकारचे कायेने घडणारे धर्माचरण कोणते? एखादा मनुष्य प्राणघात करीत नाही, तो इतरांवर शस्त्र उगारीत नाही, त्याला हल्ला करण्यास लाज वाटते, सर्व प्राणिमात्राविषयी त्याचे आचरण दयामय असते. तो चोरी करीत नाही. गावात किंवा अरण्यात दुसर्याची वस्तू दिल्याशिवाय घेत नसतो. तो व्यभिचार करीत नाही; आई, बाप, बहीण, भाऊ, पति, आप्त इत्यादिकांनी रक्षिलेल्या स्त्रियांशी संबंध ठेवीत नाही. याप्रमाणे कायेने त्रिविध धर्माचरण घडते.
“आणि गृहस्थहो, चार प्रकारचे वाचेने घडणारे धर्माचरण कोणते? एखादा मनुष्य खोटे बोलणे साफ सोडून देतो, सभेत, परिषदेत किंवा राजद्वारी त्याची साक्ष विचारली असता, तो जे जाणत नाही, ते जाणत नाही. आणि जे पाहिले नाही ते पाहिले नाही असे म्हणतो. येणेप्रमाणे आपणासाठी, परक्यासाठी किंवा थोड्याबहुत फायद्यांसाठी खोटे बोलत नाही. तो चहाडी करण्याचे सोडून देतो. ह्या लोकांचे ऐकून त्या लोकांचा भेद पाडण्यासाठी ती गोष्ट त्याना सांगत नाही. किंवा त्या लोकांचे ऐकून ह्यांना सांगत नाही, याप्रमाणे ज्यांच्यात भांडणे झाली असतील त्यांची एकी करतो आणि ज्यांच्यात एकोपा आहे त्यांना उत्तेजन देतो, एकोप्यात त्याला आनंद वाटतो आणि एकोपा होईल असे भाषण करतो. तो शिवीगाळ करण्याचे सोडून देतो. तो सरळ, कानाला गोड लागणारे, हृदयंगम, नागरिकाला शोभणारे आणि बहुजनाला आवडणारे भाषण करतो. तो बडबड करीत नाही, प्रसंगानुसार तथ्य, अर्थयुक्त, धार्मिक, शिष्टाचाराला अनुसरणारे, लक्षात ठेवण्याजोगे, योग्य वेळी, सकारण, मुद्देसूद आणि सार्थक भाषण करतो. याप्रमाणे वाचेने चतुर्विध धार्मिक आचरण घडते.
“आणि गृहस्थहो, तीन प्रकारचे मानसिक धर्माचरण कोणते? एखादा मनुष्य परद्रव्याचा लोभ धरीत नाही, परसंपत्तीची साधने आपली व्हावी असा विचार मनात आणीत नाही, त्याचे चित्त द्वेषापासून मुक्त असते, हे प्राणी अवैर, निर्बाध, दु:खरहित आणि सुखी होवोत, असा त्याचा शुद्ध संकल्प असतो, तो सम्यग्दृष्टि होतो. दानधर्म आहे, सुकृतदुष्कृत कर्माचे फळ आहे. इहलोक परलोक आहे. इत्यादि गोष्टींवर त्याचा विश्वास असतो. याप्रमाणे मनाने त्रिविध धर्माचरण घडते.” संक्षेपाने सांगावयाचे म्हटले म्हणजे प्राणघात, अद्वत्तादान (चोरी) आणि काममिथ्याचार (व्यभिचार) ही तीन कायिक पापकर्मे; असत्य, चहाडी, शिवीगाळ आणि वृथा बडबड ही चार वाचसिक पापकर्मे: आणि परद्रव्याचा लोभ, इतरांच्या नाशाची इच्छा व नास्तिक दृष्टि ही तीन मानसिक पापकर्मे होत. ह्या दहांनाही अकुशल कर्मपथ म्हणतात त्यापासून निवृत्त होणे म्हणजे कुशल कर्मपथ. ते देखील दहा आहेत, आणि त्याचे वर्णन वर आलेच आहे. दहा कुशल आणि दहा कुशल कर्मपथाची वर्णने त्रिपिटक वाङमयात पुष्कळ ठिकाणी सापडतात. वरच्या उतार्यात कुशल कर्मपथांना अधर्माचरण व कुशल कर्मपंथाना धर्माचरण म्हटले आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.