पुनरपि, भिक्षुहो, भिक्षु कशाही प्रकारच्या निवासस्थानाने संतुष्ट होतो, तशा प्रकारच्या संतुष्टीची स्तुति करतो, निवासस्थानासाठी अयोग्यआचरण करीत नाही, निवासस्थान न मिळाले तर त्रस्त होत नाही, मिळाले तर हावरा न होता, मत्त न होता, आसक्त न होता, निवासस्तानात दोष जाणुन केवळ मुक्तीसाठी ते वापरतो आणि त्या आपल्या तशा प्रकारच्या संतुष्टीने आत्मस्तुति व परनिंदा करीत नाही. जो अशा संतोषात दक्ष, सावध, हुशार व स्मृतिमान होतो, त्यालाच प्रश्नचीन अग्र आर्यवंशाला अनुसरून वागणारा भिक्षु म्हणतात.

पुनरपि, भिक्षुहो, भिक्षु समाधिभावनेत आनंद मानतो, भावनारत होतो, क्लेश नष्ट करण्यात आनंद मानतो, क्लेश नष्ट करण्यात रत होतो. आणि तशा त्या भावनारामतेने आत्मस्तुति व परनिंदा करीत नाही. जो त्या आनंदात दक्ष, सावध, हुशार व स्मृतिमान होतो, त्यालाच प्रश्नचीन अग्र आर्यवंशाप्रमाणे वागणारा भिक्षु म्हणतात.

भिक्षुहो, हे ते चार आर्यवंश.. ह्यांना कोणत्याही श्रमणांनी व ब्राह्मणांनी दोष लावला नाही.

भिक्षुहो, ह्या चार आर्यवंशानी समन्वित झालेला भिक्षु जर पूर्वे दिशेला जातो, तर तोच अरतीला जिंकतो, अरति त्याला जिंकीत नाही.. पश्चिम.. उत्तर.. दक्षिण दिशेला जातो, तर तोच आरतीला जिंकतो, अरति त्याला जिंकीत नाही. ते का? कारण धीर अरतीवर आणि रतीवर जय मिळतो.

धीराला जिंकणारी अरति नव्हे. अरति धीरावर जय मिळवू शकत नाही. अरतीला जिंकणारा धीर तो रतीवर विजय मिळवितो.

सर्व कर्माचा त्याग करणा-या व रागद्वेषादिकांचे निरसन करणा-या त्या धीराच्या आड कोण येईल? शंभर नंबरी सोन्याच्या नाण्यासारख्या त्याला दोष कोण लावील? देवही त्याची प्रशंसा करितात. आणि ब्रह्मदेव देखील प्रशंसा करतो.

अनागतभयानि


हे सुत्त अड्.गुत्तरनिकायाच्या पकनिपातात सापडते. त्याचे रूपांतर येणेप्रमाणे-
भिक्षुहो, ही पाच अनागभये पाहणार्या भिक्षुला अप्रश्नप्त पदाच्या प्रश्नप्तीसाठी, जे जाणले नाही ते जाणण्यासाठी, ज्याचा साक्षात्कार झाला नाही, त्याच्या साक्षात्कारासाठी, अप्रमत्तपणे, उद्यमशीलतेने आणि मन लावून वागण्याला पुरे आहेत. ती पाच कोणती?

येथे, भिक्षुहो, भिक्षु असा विचार करतो की, मी सांप्रत तरुण व यौवनसंपन्न आहे. पण असा एक काळ येईल की, ह्या शरीराला जरा प्राप्त होईल. वृद्धाला, जराजीर्णाला बुद्धाच्या धर्माचे मनन सुकर नाही, अरण्यात एकान्तवासात राहणे सुकर नाही. ती अनिष्ट अप्रिय दशा येण्यापूर्वीच म्यां अप्राप्तपदाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न केलेलला बरा. जेणेकरून वृद्धावस्थेत देखील मी सुखाने राहू शकेन. हे पाहिले अनागतभय पाहणार्‍या भिक्षुला..   मन लावून वागयला लावण्यास पुरे आहे.

पुनरपि, भिक्षुहो, भिक्षु असा विचार करतो की, सध्या मी निरोगी आहे, माझा जठराग्नि चांगला आणि प्रयत्नाला अनुकूल आहे. पण असा एक काळ येतो की, हे शरीर व्याधिग्रस्त होते. व्याधिग्रस्त वृद्धाच्या धर्माचे मनन सुकर नाही, अरण्यात एकान्तवासात राहणे सुकर नाही. ती अनिष्ट अप्रिय अवस्था प्रश्नप्त होण्यापूर्वीच म्या.. प्रयत्न केलेला बरा. जेणेकरून रुग्णावस्थेत देखील मी सुखाने राहू शकेन. हे दुसरे अनागत भय पाहणार्‍या भिक्षुला.. मन लावून वागायला लावण्यास पुरे आहे.

पुनरपि, भिक्षुहो, भिक्षु असा विचार करतो की, सध्या सुभिक्ष आहे, भिक्षा सहज मिळते, भिक्षेवर निर्वाह करणे सोपे आहे. पण असा एक काळ येतो की, दुर्भिक्ष होते. धान्य पिकत नाही, भिक्षा मिळणे कठिण जाते, भिक्षेवर निर्वाह करणे सोपे नसते. अशा दुर्भिक्षात लोक जिकडे सुभिक्ष असेल तिकडे जातात. तेथे गर्दी होते. तशा ठिकाणी बुद्धाच्या धर्माचे मनन सुकर नाही, अरण्यात एकान्तवासात राहणे सुकर नाही. ती अनिष्ट अप्रिय परिस्थिति प्राप्त होण्यापूर्वीच प्रयत्न केलेला बरा. जेणेकरून मी दुर्भिक्षात देखील सुखाने राहू शकेन. हे तिसरे अनागत भय पाहणार्‍या भिक्षुला मन लावून वागायला लावण्यास पुरे आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel