म्हणजे हत्ती, गाई, घोडे वगैरे सपंत्तीतच कोंबडी आणि डुकरें यांचा देखील समावेश होत असें. असें असतां डुकराच्या मांसासंबधी इतका तिटकारा कसा उद्भवला? यज्ञयांगात मारल्या जाणार्या प्राण्यांत डुकराचा उल्लेख पालिवाङयांत सापडत नाही. अर्थात् बुध्दकालीं हा प्राणी अमेध्य होता. पण तो अभक्ष्य होता. याला कांही आधार सापडत नाही. तसें असतें तर क्षत्रियांच्या घरच्या संपत्तीत त्याचा समावेश झाला नसता. सूकरमांसाचा निषेध प्रथमत: धर्मसूत्रांत सापडतो.* आणि पुढे त्याचाच अनुवाद मनुस्मृति वगैरे स्मृतिग्रन्थांत येतो. † परंतु अरण्यसूकराचा कधीच निषेध झाला नाही. त्याचे मांस पवित्र गणलें गेलें आहे.‡
बुध्दावर अमिताहाराचा खोटा आरोप
बुध्द भगवंताने परिनिर्वाणापूर्वी खाल्लेला पदार्थ सूकरमांस होता, असें गृहित धरून चाललों, तरी तो त्याने अजीर्ण होईपर्यंत खाल्ला व त्यामुळे तो मरण पावला, हें जें कुत्सित टीकाकारांचे म्हणणे, तें मात्र सपशेल खोटें आहे. गोतम बुध्दाने अमित आहार केल्याचें उदाहरण किंवा दाखला कोठेच सापडत नाही. तेव्हा याच प्रसंगी त्याने हा पदार्थ प्रमाणाबाहेर खाल्ला, असें म्हणणें निव्वळ खोडसाळपणाचें आहे. बुध्द भगवान् त्या प्रसंगापूर्वी तीन महिने वैशाली येथे भयंकर आजारी झाला होता आणि त्यामुळे त्याच्या अंगात त्राण राहिलें नव्हतें. चुंदाने दिलेलें जेवण केवळ त्याच्या परिनिर्वाणाला निमित्तकारण झाले. त्यायोगें चुंद लोहारावर लोकांनी भलताच आळ आणूं नये म्हणून परिनिर्वाणापूर्वी भगवान् आनंदाला म्हणाला, ''आनंदा, चुंद लोहाराला कोणी म्हणेल की, हे चुंदा, तथागत तूं दिलेली भिक्षा घेऊन परिनिर्वाण पावला, यात तुझी मोठी हानि आहे. असें म्हणून जर त्याने चुंद लोहाराला वाईट वाटूं दिलें, तर तुम्ही चुदाचे दौर्मनस्य याप्रमाणे नष्ट करा. त्याला म्हणां, चुंदा, ज्या तुझा पिंडपात खाऊन तथागत परिनिर्वाण पावला, त्या तुला तें तुझें दान खरोखरच लाभदायक आहे. आम्ही तथागताकडून ऐकलें आहे की, इतर भिक्षापेंक्षा तथागताला मिळालेल्या दोन भिक्षा अधिक फलदायक व अधिक प्रशंसनीय आहेत. त्या कोणत्या ? जी भिक्षा घेऊन तथागत संबोधिज्ञान मिळवतो ती, आणि जी भिक्षा घेऊन परिनिर्वाण पावतो ती. चुंदाने जें कृत्य केलें आहे, तें आयुष्य, वर्ण, सुख, यश, स्वर्ग आणि स्वामिन देणारें आहे, असें समजावें. आनंदा, याप्रमाणे चुंदाचे दौर्मनस्य घालवावे.''
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* काककंकगृध्रश्येना जलजरक्तपादतुण्डा ग्राम्यकुक्कुटसूकरा:। गौतमसूत्र, अ. ८।२९.
'एकखुरोष्ट्रगवयग्रामसूकरसरभगवाम् |’ आपस्तम्बधर्मसूत्र प्रश्न १, पटल ५, खण्डिका १७।२९.
† मनुस्मृति, अ. ५।१९.
‡ मनुस्मृति, अ. ३।२७०.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.