पाली भाषेत :

५ यो नाज्झगमा भवेसु सारं विचिनं पुप्फमिव उदुंबरेसु।
सो भिक्खु जहाति ओरपारं उरगो जिण्णमिव तचं पुराणं ।।५।।

६ यस्सऽन्तरतो न सन्ति कोपा इति भवाभवतं च वीतिवत्तो।
सो भिक्खु जहाति ओरपारं उरगो जिण्णमिव तचं पुराणं ।।६।।

७ यस्स वितक्का विधूपिता१ (१. म.-विदूसिता) अज्झत्तं सुविकप्पिता असेसा।
सो भिक्खु जहाति ओरपारं उरगो जिण्णमिव तचं पुराणं ।।७।।

मराठीत अनुवाद :


५. उदुंबर वृक्षावर जसें शोधूं गेलें तरी फूल सांपडत नाहीं, तसें ज्याला भवांत (पुनर्जन्मांत) सार दिसलें नाहीं तो भिक्षु, सर्प जसा जीर्ण झालेली जुनी कातडी टाकून जातो, तद्वत् इहपरलोक सोडून जातो. (५)

६. ज्याच्या अन्त:करणांत कोप पाहिला नाहीं, व जो शाश्वतता आणि अशाश्वतता१ (१. अट्ठकथाकारानें दिलेल्या अनेक अर्थांपैकीं हा एक अर्थ आहे.) यांच्या पलीकडे पोहोंचला आहे तो भिक्षु, सर्प जसा जीर्ण झालेली जुनी कातडी टाकून जातो, तद्वत् इहपरलोक सोडून जातो. (६)

७. ज्याच्या अन्तकरणांतील वितर्क२ (२. वितर्क तीन प्रकारचे-(१) कामवितर्क, (२) व्यापादवितर्क व (३) विहिंसावितर्क) जाळून समूळ कापून टाकले गेले आहेत तो भिक्षु, सर्प जसा जीर्ण झालेली जुनी कातडी टाकून जातो, तद्वत् इहपरलोक सोडून जातो. (७)

पाली भाषेत :


८ यो नाच्चसारी१ (१. म.—नच्चसारि.) न पच्चसारी सब्बं अच्चगमा२ (२. म. अज्झ.) इमं पपञ्चं।
सो भिक्खु जहाति ओरपारं उरगो जिण्णमिव तचं पुराणं ।।८।।

९ यो नाच्चसारी न पच्चसारी सब्बं वितथमिदं ति ञत्वा लोके।
सो भिक्खु जहाति ओरपारं उरगो जिण्णमिव तचं पुराणं ।।९।।

१० यो नाच्चसारी न पच्चसारी सब्बं वितथमिदं ति वीतलोभो।
सो भिक्खु जहाति ओरपारं उरगो जिण्णमिव तचं पुराणं ।।१०।।

मराठीत अनुवाद :-

८. जो पुढें धांव घेत नाहीं व मागेंही पडत नाहीं१, (१. पुढें धांव घेणें म्हणजे अतिविचार करणें, व मागें पडणें म्हणजे आळसांत पडून राहणें) व जो या प्रपंचाच्या पार गेला आहे तो भिक्षु, सर्प जसा जीर्ण झालेली जुनी कातडी टाकून जातो, तद्वत् इहपरलोक सोडून जातो. (८)

९. जो पुढें धांव घेत नाहीं व मागेंही पडत नाहीं, व (प्रापंचिक) वस्तुजात भासते तशी खरोखर नाहीं असें जो जाणतो तो भिक्षु, सर्प जसा जीर्ण झालेली जुनी कातडी टाकून जातो, तद्वत् इहपरलोक सोडून जातो. (९)

१०. जो पुढें धांव घेत नाहीं व मागेंही पडत नाहीं, आणि (प्रापंचिक) वस्तु जात भासते तशी खरोखर नाहीं असें जो जाणून वीतलोभ होतो तो भिक्षु, सर्प जसा जीर्ण झालेली जुनी कातडी टाकून जातो, तद्वत् इहपरलोक सोडून जातो. (१०)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel