पाली भाषेत :-

६४ ओहारयित्वा गिहिव्यञ्ञनानि संछिन्नपत्तो१ (१ सी.-संछन्न. ) यथा पारिछतो।
कासायवत्थो अभिनिक्खमित्वा एको चरे खग्गविसाणकप्पो।।३०।।

६५ रसेसु गेधं अकरं अलोलो अनञ्ञपोसी सपदानचारी।
कुले कुले अप्पटिबद्धचित्तो एको चरे खग्गविसाणकप्पो।।३१।।

६६ पहाय पंचावरणानि चेतसो उपक्किलेसे व्यपनुज्ज२ (२ नि.-ब्य) सब्बे।
अनिस्सितो छेत्वा सिनेहदोसं३ (३ अ., म.-स्नेह.) एको चरे खग्गविसाणकप्पो।।३२।।

६७ विपिट्ठिकत्वान सुखं दुखं४(४ म.-दुक्खं.) च पुब्बे व च सोमनदोमनस्सं५ (५ म., अ.-सोमनस्सदोमनस्सं.)
लद्धानुपेक्खं समथं विसुद्धं एको चरे खग्गविसाणकप्पो।।३३।।

मराठीत अनुवाद :-

६४. पानें गळून गेलेल्या पारिच्छत्र (पारिजात) वृक्षाप्रमाणें गृहस्थाश्रमाचीं चिन्हें टाकून काषाय वस्त्रें परिधान करून व पूर्णपणें गृहत्याग करून गेंड्याच्या शिंगाप्रमाणें एकाकी राहावें. (३०)

६५. जिभेची चट नाहीं. अचंचल, दुसर्‍यांना न पोसणारा, लहानमोठ्या घरीं क्रमश:१ (१. आपणांस कदाचित् चांगली भिक्षा मिळणार नाहीं म्हणून आपल्या मार्गांतील गरिबांचीं घरें कांहीं लोक टाळतात; तसें न करणारा) (एकादें घर न चुकवतां) भिक्षा ग्रहण करणारा, कोणत्याही कुटुंबाविषयीं आसक्ति न ठेवणारा-असा (होऊन) गेंड्याच्या शिंगाप्रमाणें एकाकी राहावें. (३१)

६६. चित्ताचीं पांच आवरणें सोडून, चित्तक्लेश दूर सारून, आनासक्त होऊन व स्नेहदोष तोडून गेंड्याच्या शिंगाप्रमाणें एकाकी राहावें. (३२)

६७. आधीं सौमनस्य आणि दौर्मनस्य व नंतर सुख व दु:ख मागें टाकून, उपेक्षायुक्त शुद्ध शम (समाधि) संपादून गेंड्याच्या शिंगाप्रमाणें एकाकी राहावें. (३३)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel