पाली भाषेत :-
[५. चुन्दसुत्तं]

८३ पुच्छामि मुनिं पहूतपञ्ञं (इति चुन्दो कम्मारपुत्तो) बुद्धं धम्मस्सामिं वीततण्हं।
दिपदुत्तमं१(१ म.-द्विपदुत्तमं.) सारथीनं पवरं। कति लोके समणा तदिंघ ब्रूहि।।१।।

८४ चतुरो समणा न पञ्चमत्थि२ (२ रो.-पञ्चमोऽत्थि.) (चुन्दा ति भगवा) ते ते आविकरोमि सक्खिपुट्ठो।
मग्गजिनो मग्गदेसको च मग्गे जीवति यो च मग्गदूसी।।२।।

८५ कं मग्गजिनं वदन्ति बुद्धा (इति चुन्दो कम्मरपुत्तो) मग्गऽक्खायी३ (३ रो.-मग्गज्झायी.) कथं अतुल्यो होती।
मग्गे जीवति मे ब्रूहि पुट्ठो। अथ मे आविकरोहि मग्गदूसिं।।३।।

मराठीत अनुवाद :-


[५. चुन्दसुत्तं]


८३. विपुलप्रज्ञ, धर्मस्वामी, वीततृष्ण, द्विपदश्रेष्ठ, सारथ्यांत सर्वोत्तम अशा मुनीला, बुद्धाला मी विचारतों-असें चुन्द लोहार म्हणाला-इहलोकीं श्रमण किती तें सांग. (१)

८४. चारच श्रमण, पांचवा नाहीं-हे चुन्दा, असें भगवान् म्हणाला-तूं विचारलें म्हणून तें तुला मीं सांगतों. मार्गजिन, मार्ग-दर्शक, मार्गजीवी आणि मार्गदूषक (हे ते चार). (२)

८५. बुद्ध कोणाला मार्गजिन म्हणतात-असें चुन्द लोहार म्हणाला-अतुल असा मार्गदर्शक कसा होतो? मार्गजीवी कोणता आणि मार्गदूषक कोणता?-हें मी विचारतों तें तूं मला सांग. (३)

पाली भाषेत :-

८६ यो तिण्णकथंकथो विसल्लो निब्बाणाभिरतो अनानुगिद्धो१ (१ सी.-अननुगिद्धो.)
लोकस्स सदेवकस्स नेता तादिं मग्गजिनं वदन्ति बुद्धा।।४।।

८७ परमं परमं ति यो घ ञत्वा अक्खाति विभजति इधेव धम्मं।
त कंखच्छिदं मुनिं अनेजं दुतियं भिक्खुनमाहु मग्गदोसिं।।५।।

८८ यो धम्मपदे सुदेसिते मग्गे जीवति संयतो२ (२ रो., सी.-सञ्ञतो.) सतीमा।
अनवज्जपदानि सेवमानो ततियं भिक्खुनमाहु मग्गजीविं।।६।।

८९ छदनं कत्वान सुब्बतानं पक्खन्दि कुलदूसको पगब्भो।
मायावी असञ्ञतो पलापो पकिरूपेन चरं स मग्गदूसी।।७।।

९० एते च पटिविज्झि यो गहट्ठो सुतवा अरियसावको सपञ्ञो सब्बे नेतादिसा ति ञत्वा इति दिस्वा न हापेति तस्स सद्धा कथं हि दुट्ठेन असंपदुट्ठं सुद्धं असुद्धेन समं करेय्या ति।।८।।

चुन्दसुत्तं निट्ठितं।

मराठीत अनुवाद  :-

८६. जो शंकेच्या पार गेलेला, तृष्णाशल्यरहित, निर्वाणाभिरत, निर्लोभी आणि सदेवक जगाचा नेता अशा माणसाला बुद्ध मार्गजिन म्हणतात.(४)

८७. परम (जें निर्वाण तें) परमत्वानें इहलोकीं जाणून जो धर्मोपदेश करतो, धर्माचें विवेचन करतो, त्या शंका दूर करणार्‍या तृष्णाविरहित मुनीला दुसरा (म्हणजे) मार्गदर्शक-भिक्षु म्हणतात.(५)

८८. उत्तम प्रकारें उपदिष्ट धर्ममार्गांत जो संयमी, स्मृतिमान्, अनवद्य पदार्थांचे सेवन करणारा होऊन वागतो, त्याला तिसरा (म्हणजे) मार्गजीवी भिक्षु म्हणतात.

८९. साधूंचा वेष घेऊन जो (संघात) घुसणारा, कुटुंबाची अपकीर्ति फैलावणारा, धृष्ट, मायावी, असंयत, फोल-असा असतां बाह्यत्कारीं साधूसारखा वागणारा, तो मार्गदूषक होय. (७)

९०. ज्या विद्वान् सप्रज्ञ आर्यश्रावक गृहस्थानें हे (श्रमण जाणले आहेत, तो ‘सगळेच त्यासारखे नाहींत’ असें जाणून व हें पाहून आपली श्रद्धा कमी करीत नाहीं. कारण दुष्ट आणि अदुष्ट शुद्ध आणि अशुद्ध हे सारखेच. असें तो कसें समजेल?(८)

चुन्दसुत्त समाप्त

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel