पाली भाषेत :- मराठी
[६. पराभवसुत्तं]

एवं मे सुतं। एकं समयं भगवा सावत्थियं विहरति जेतवने अनाथपिण्डिकस्स आरामे। अथ खो अञ्ञतरा देवता अभिक्कन्ताय रत्तिय अभिक्कन्तवण्णा केवलकप्पं जेतवनं ओभासेत्वा येन भगवा तेनुपसंकमि। उपसंकमित्वा भगवन्तं अभिवादेत्वा एकमन्तं अट्ठासि। एकमन्तं ठिता खो सा देवता भगवन्तं गाथाय अज्झभासि—

मराठीत अनुवाद :-
६  
[६. पराभवसुत्त]

असें मीं ऐकलें आहे. एके समयीं भगवान् श्रावस्ती येथें जेतवनांत अनाथपिंडिकाच्या आरामांत राहत होता. तेव्हां रात्र संपत आली असतां एक अत्यंत सुन्दर देवता सर्व प्रकाशित करून भगवान् होता तेथें आली. तेथें येऊन भगवन्ताला नमस्कार करून एका बाजूस उभी राहिली. एका बाजूला उभी राहून ती देवता भगवंताशीं गाथेनें बोलली—

पाली भाषेत  :-

९१ पराभवन्तं पुरिसं मयं पुच्छाम गोतमं।
भगवन्तं पुट्ठुमागम्म किं पराभवतो मुख।।१।।

९२ सुविजानो भवं होति सुविजानो पराभवो।
धम्मकामो भवं होति धम्मदेस्सी पराभवो।।२।।

९३ इति हेतं विजानाम पठमो सो पराभवो।।
दुतियं भगवा ब्रूहि किं पराभवतो मुखं।।३।।

९४ असन्तस्स पिया होन्ति सन्ते न कुरुते पियं।
असतं धम्मं रोचेति तं पराभवतो मुखं।।४।।

मराठीत अनुवाद :-


९१. आम्ही भगवंताला विचारण्यास येऊन पराभव पावणारा पुरुष कोणता हें विचारतों. पराभवाचें कारण कोणतें?(१)

९२. (भगवान्-) वृद्धिंगत होणारा पुरुष सहज जाणतां येतो. पराभव पावणाराही सहज जाणतां येतो. वृद्धिंगत होणारा धर्मपरायण असतो; पराभव पावणारा धर्माचा द्वेष करतो. (२)

९३. (देवता-) हा पहिला पराभव आम्हांस समजला. भगवन्, दुसरें पराभवाचें कारण कोणतें तें साग. (३)

९४. त्या (पुरुषाला) खल आवडतात, सज्जनाविषयीं प्रेम नसतें, व खलांचा धर्म आवडतो, हें (त्याच्या) पराभवाचें कारण होय. (४)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel