पाली भाषेत :-

[९. हेमवतसुत्तं]


१५३ अज्ज पण्णरसो उपोसथो (इति सातागिरो यक्खो) दिव्या रत्ति उपट्ठिता।
अनोमनामं सत्थारं हन्द पस्साम गोतमं।।१।।

१५४ कच्चि मनो सुपणिहितो (इति हेमवतो यक्खो) सब्बभूतेसु तादिनो।
कच्चि इट्ठे अनिट्ठे च संकप्पस्स वसीकता।।२।।

१५५ मनो चऽस्स सुपणिहितो (इति सातागिरो यक्खो) सब्बभूतेसु तादिनो।
अथो इट्ठे अनिट्ठे च संकप्पस्स वसीकता।।३।।

मराठीत अनुवाद :-

[९. हेमवतसुत्त]


१५३. आज पौर्णिमेचा उपोसथ-असें सातागिर यक्ष म्हणाला- रात्र दिव्य आहे, चल, आपण नामांकित गुरूला-गोतमाला भेटू! (१)

१५४. त्याचें मन-असें हेमवत यक्ष म्हणाला-सर्व प्राणिमात्रांविषयीं सुस्थिर आहे काय? इष्ट आणि अनिष्ट वस्तूंचे संकल्प त्याच्यास्वाधीन आहेत का.?(२)

१५५. त्याचें मन-सातगिर यक्ष म्हणाला-सर्व प्राणिमात्रांविषयीं सुस्थिर आहे, आणि इष्ट आणि अनिष्ट वस्तूंचे संकल्प त्याच्या ताब्यांत आहेत. (३)

पाली भाषेत :-

१५६ कच्चि अदिन्नं नादियति (इति हेमवतो यक्खो) कच्चि पाणेसु सञ्ञतो।
अथो आरा पमादम्हा कच्चि झानं न रिञ्चति।।४।।

१५७ न सो अदिन्नं आदियति (इति सातागिरो यक्खो) अथो पाणेसु सञ्ञतो।
अथो आरा पमादम्हा बुद्धो झानं न रिञ्चति।।५।।

१५८ कच्चि मुसा न मणति (इति हेमवतो यक्खो) कच्चि न खीणव्यप्पथो१ (१ अ.- ‘नाखीणव्यप्पथो’तिऽपि)
कच्चि वेभूतियं नाह कच्चि सम्फं न भासति।।६।।

१५९ मुसा च सो भणति (इति सातागिरो यक्खो) अथो न खीणव्यप्पथो।
अथो वेभूतियं नाह मन्ता अत्थं सो भासति।।७।।

मराठीत अनुवाद :-

१५६. तो चोरी करीत नाहीं ना?- असें हेमवत यक्ष म्हणाला-प्राणघात करीत नाहीं ना? प्रमादापासून दूर राहतो ना? ध्यान-समाधींत दक्ष आहे ना? (४)

१५७. तो चोरी करीत नाहीं-सातागिर यक्ष म्हणाला- प्राणघात करीत नाहीं, प्रमादापासून दूर राहतो आणि तो बुद्ध ध्यानसमाधींत दक्ष असतो. (५)

१५८. तो खोटे बोलत नाहीं ना?- असें हेमवत यक्ष म्हणाला-कठोर वचन बोलत नाहीं ना? चहाडी करत नाहीं ना? बडबड करत नाहीं ना? (६)

१५९. तो खोटे बोलत नाहीं - सातागिर यक्ष म्हणाला -कठोर वचन बोलत नाहीं, चहाडी करत नाहीं व तो प्रज्ञेनें अर्थपूर्ण भाषण करतो. (७)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel