पाली भाषेत :-

१६७ अक्खातारं पवत्तारं सब्बधम्मान पारगुं।
बुद्धं वेरभयातीतं मयं पुच्छाम गोतमं।।१५।।

१६८ किस्मिं लोको समुप्पन्नो (इति हेमवतो यक्खो) किस्मिं कुब्बति सन्थवं।
किस्स लोको उपादाय किस्मिं लोको विहञ्ञति।।१६।।

१६९ छस्सु लोको समुप्पन्नो (हेमवता ति भगवा) छस्सु कुब्बति सन्थवं।
छन्नमेव उपादाय छस्सु१ (१. म.-छसु.) लोको विहञ्ञति।।१७।।

१७० कतमं तं उपादानं यत्थ लोको विहञ्ञति।
निय्यानं पुच्छतो ब्रूहि कथं दुक्खा पमुच्चति।।१८।।

मराठीत अनुवाद :-

१६७. आख्याता, प्रवक्ता, सर्व धर्मांच्या पार गेलेला, वैर आणि भय यांना ओलांडून गेलेला, असा जो बुद्ध त्याला आम्ही विचारतों.(१५)

१६८. कशामुळे लोक उत्पन्न होतो?- असें हेमवत यक्ष म्हणाला—कशांत तो ममत्व करतो? त्याला लोक कां म्हणतात व तो कां विघात पावतो? (१६)

१६९. सहांमुळें१ (१. सहांमुळें म्हणजे पंचेंन्दियें व मन या सहांमुळे या सहांना आध्यात्मिक आयतनें म्हणतात.) लोक उत्पन्न होतो?-हे हेमवता, असें भगवान् म्हणाला- या सहांत तो ममत्व करतो. या सहांमुळे त्याला लोक म्हणतात; व या सहांमुळें तो विघात पावतो. (१७)

१७०. असें उपादान कोणतें कीं, ज्याच्यामुळें लोक विघात पावतो? त्यापासून सुटका कशी होते, हें आम्ही विचारतों; दु:खापासून मुक्त कसा होतो, तें सांग. (१८)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel