पाली भाषेत :-

१७६ गंभीरपञ्ञं निपुणत्थदस्सिं। अकिञ्चनं कामभवे असत्तं।
तं पस्सथ सब्बधि विप्पमुत्तं। दिब्बे पथे कममानं१ (१ म.-चंकमनं.) महेसिं।।२४।।

१७७ अनोमनामं निपुणत्थदस्सिं। पञ्ञाददं कामालये असत्तं।
तं पस्सथ सब्बविदुं सुमेधं। अरिये पथे कममानं महेसिं।।२५।।

१७८ सुदिट्ठं वत नो अज्ज सुप्पभातं सुहुट्ठितं।
यं अद्दसाम संबुद्धं ओघतिण्णमनासवं।।२६।।

१७९ इमे दससता यक्खा इद्धिमन्तो यसस्सिनो।
सब्बे तं सरणं यन्ति त्वं नो सत्था अनुत्तरो।।२७।।

१८० ते मयं विचरिस्साम गामा गामं नगा नगं।
नमस्समाना संबुद्धं धम्मस्स चसुधम्मतं ति।।२८।।

हेमवतसुत्तं१
( १. अ.-सातागिरिसुत्तंति एकच्चेहि।) निट्ठितं

मराठीत अनुवाद :-

१७६. (हेमवत-) गंभीरप्रज्ञ, सूक्ष्मार्थदर्शी, नि:स्पृ:ह१, (१. रागादिधर्म ज्याच्या ठिकाणीं नाहींत असा अकिञ्चन) कामालयांत अनासक्त, अशा त्या सर्वयैव, अशा त्या आर्य पंथानें चालणार्‍या महर्षींला पहा! (२४)

१७७. नामांकित, सूक्ष्मार्थदर्शी, प्रज्ञादायक, कामालयांत अनासक्त, सर्वज्ञ आणि सुमेध अशा त्या आर्य पन्थानें चालणार्‍या महर्षीला पहा! (२५)

१७८. आज आम्हांला चांगलें दर्शन घडलें, आजची पहाट शुभदायक झाली व आमचें (सकाळचें) उठणेंही शुभदायक झालें. कां कीं, आम्ही आज त्या ओघतीर्ण अनाश्रव संबुद्धाला पाहिलें. (२६)

१७९. हे ऋद्धिमन्त आणि यशस्वी एक हजार यक्ष—ते सर्व तुला शरण जात आहेत. तूं आमचा अनुत्तर शास्ता हो. (२७)

१८०. ते आम्ही संबुद्धाला आणि धर्माच्या सुमर्धतेला नमस्कार करीत गांवोगांवीं आणि पहाडोंपहाडीं फिरत राहूं! (२८)

हेमवतसुत्त समाप्त
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel