पाली भाषेत :-

२१९ अञ्ञाय लोकं परमत्थदस्सिं। ओघं समुद्दं अतितरिय तादिं।
तं छिन्नगन्थं असितं अनासवं। तं वाऽपि धीरा मुनिं वेदयन्ति।।१३।।

२२० असमा उभो१  (१ सी.-वुभो.) दूरवुहारवुत्तिनो। गिहि दारपोसी अममो च सुब्बतो।
परपाणरोधाय गिही२ ( २ म.-गिहि.) असञ्ञतो। निच्चं मुनी३ ( ३.म.-मुनि.) रक्खति पाणिनो यतो।।१४।।

२२१ सिखी यथा नीलगीवो विहंगमो। हंसस्स नोपेति जवं कुदाचनं।
एवं गिही नानुकरोति भिक्खुनो। मुनिनो विवित्तस्स वनम्हि झायतो ति।।१५।।

मुनिसुत्तं निट्ठितं।
उरगवग्गो पठमो।


मराठीत अनुवाद :-

२१९. इहलोक जाणून ज्यानें परमार्थ पाहिला, जो ओघ आणि समुद्र तरून तादृग्भाव पावला, जो छिन्नग्रंथि, अनाश्रित आणि अनाश्रव— त्याला सुज्ञ लोक मुनि म्हणतात. (१३)

२२०. बायकोला पोसणारा गृहस्थ व निर्मम, सु-व्रती संन्यासी, हे सारखे नाहींत. या दोघांची राहणी व वृत्ति फार भिन्न आहे. कारण परप्राणघात न व्हावा याविषयीं गृहस्थ संयम बाळगीत नाहीं व मुनि संयत होत्साता सदोदित प्राण्यांचें रक्षण करतो. (१४)

२२१. जसा आकाशांत उडणारा नीलग्रीव मोर कधींहि हंसाच्या वेगानें जाऊं शकत नाहीं, त्याप्रमाणें गृहस्थ एकान्तीं वनांत ध्यान करणार्‍या भिक्षूचें—मुनीचें अनुकरण करूं शकत नाहीं. (१५)

मुनिसुत्त समाप्त।
उरगवग्ग पहिला समाप्त।
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel