पाली भाषेत :-
तस्सुद्दानं-


उरगो धनियो चेव विसाणं च तथा कसि।
चुन्दो पराभवो चेव वसलो मेत्तभावना।।
सातागिरो आळवको विजयो च तथा मुनि।
द्वादसेतानि सुत्तानि उरगवग्गो ति वुच्चति।।

[चुळवग्गो दुतियो]
१३
[१. रतनसुत्तं]


२२२ यानीध भूतानि समागतानि। भुम्मानि वा यानि व अन्तळिक्खे।
सब्बे च भूता सुमना भवन्तु। अथो च सक्कच्च सुणन्तु भासितं।।१।।


मराठीत अनुवाद :-

त्यांतील सुत्तें—उरग, धनिय आणि खग्गविसाण, कसिभारद्वाज, चुन्द, पराभव आणि वसल, मेत्ताभावना, सातागिर, आळवक, विजय आणि मुनि—हीं बारा सुत्तें मिळून उरगवर्ग होतो.

[चुळवग्ग दुसरा]
१३
[१. रतनसुत्त]


२२२. भूमिगत किंवा अन्तरिक्षांतील जीं भूतें येथें जमलीं असतील तीं सर्व भूतें आनंदित होवोत, आणि हें सुभाषित आदरपूर्वक ऐकोत. (१)

पाली भाषेत :-

२२३ तस्मा हि भूता निसामेथ सब्बे। मेत्तं करोथ मानुसिया पजाय।
दिवा च रत्तो च हरन्ति ये बलिं। तस्मा हि ने रक्खय अप्पमत्ता।।२।।

२२४ यं किञ्चि वित्तं इध वा हुरं वा। सग्गेसु वा यं रतनं पणीतं।
न नो समं अत्थि तथागतेन। इदंऽपि बुद्धे रतनं पणीतं।
एतेन सच्चेन सुवत्थि होतु।।४।।

२२५ खयं विरागं अमतं पणीतं। यदज्झगा सक्यमुनी समाहितो।
न तेन धम्मेन समत्थि किञ्चि। इदंऽपि धम्मे रतनं पणीतं।
एतेन सच्चेन सुवत्थि होतु।।४।।

२२६ यं बुद्धसेट्ठो परिवण्णयी सुचिं। समाधिमानन्तरिकञ्ञमाहु।
समाधिना तेन समो न विज्जति। इदंऽपि धम्मे रतनं पणीतं।
एतेन सच्चेन सुवत्थि होतु।।५।।

मराठीत अनुवाद :-


२२३. म्हणून हे सर्व भूतांनो, हें ऐका. मनुष्यजातीवर प्रेम करा. रात्रंदिवस मनुष्य तुम्हांला नैवेद्य देतात. म्हणून त्यांचें तुम्ही सावधानपणें रक्षण करा. (२)

२२४. इह किंवा परलोकीं जें वित्त असेल, किंवा स्वर्गांत जें उत्तम रत्‍न असेल, तें आमच्या तथागताच्या तोडीचें असणार नाहीं. बुद्धाचें ठायीं वसणारें हें उत्तम रत्‍न आहे. ह्या सत्यानें स्वस्ति होवो. (३)

२२५. समाहित शाक्यमुनीनें तृष्णाक्षयमय, विरागमय, अमर असा जो उत्तम धर्म जाणला, त्याच्यासारखा दुसरा नाहीं. धर्माचें ठायीं वसणारें हें उत्तम रत्‍न आहे. ह्या सत्यानें स्वस्ति होवो. (४)

२२६. ज्या शुद्ध समाधीची बुद्धश्रेष्ठानें प्रशंसा केली, जिला ताबडतोब फळ देणारी म्हणतात, त्या समाधासारखी दुसरी नाहीं. धर्माचें ठायीं वसणारें हें उत्तम रत्‍न आहे. ह्या सत्यानें स्वस्ति होवो. (५)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel