पाली भाषेत :-

२९६ यथा माता पिता भाता अञ्ञे वाऽपि च ञातका।
गावो नो परमा मित्ता यासु जायन्ति ओसधा।।१३।।

२९७ अन्नदा बलदा चेता वण्णदा सुखदा तथा।
एतमत्थवसं ञत्वा नास्सु गावो हनिंसु ते।।१४।।

२९८ सुखुमाला महाकाया वण्णवन्तो यसस्सिनो।
ब्राह्मणा सेहि धम्मेहि किच्चिकिञ्चेसु उस्सुका।
याव लोके अवत्तिंसु सुखमेधित्थऽयं पजा।।१५।।

२९९ तेसं आसि विपल्लासो दिस्वान अणुतो अणुं।
राजिनो च वियाकारं नारियो समलंकता।।१६।।

३०० रथे चाजञ्ञसंयुत्ते सुकते चित्तसिब्बने।
निवेसने निवेसे च विभत्ते भागसो मिते।।१७।।

मराठीत अनुवाद :-

२९६. जसे आईबाप, भाऊ किंवा इतर सगेसोयरे, तशा गाई आमच्या परम मित्र होत! कारण (पंच गोरसादि) औषधें त्यांच्यापासूनच उपलब्ध होतात. (१३)

२९७. त्या अन्न देणार्‍या, बल देणार्‍या, कान्ति देणार्‍या, आणि सुख देणार्‍या आहेत; हें तत्त्व जाणून ते (प्राचीन ब्राह्मण) गाई मारीत नसत. (१४)

२९८. सुकुमार, उंच बांध्याचे, तेजस्वी आणि यशस्वी असे ते ब्राह्मण स्वकीय धर्मानुसार कृत्याकृत्यांविषयीं दक्ष राहत असत, व जोपर्यंत ते तसे होते तोपर्यंत लोक सुखी झाले. (१५)

२९९. परन्तु राजाची संपत्ति आणि अलंकृत स्त्रिया-अशा-सारख्या अत्यंत क्षुद्र गोष्टी पाहून त्यांची बुद्धि पालटली. (१६)

३००. उत्तम घोडे जोडलेले व उत्तम रीतीनें तयार केलेले व आच्छादन घातलेले रथ, नीट रीतीनें विभाग पाडून बांधलेली घरें व इमारती, (१७)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel