पाली भाषेत :-

३४२. अनिमित्तं च भावेहि मानानुसयमुज्जह |
ततो मानाभिसमया उपसन्तो चरिस्ससी ति ||८||

इत्थं सुदं भगवा आयस्मन्तं राहुलं इमाहि गाथाहि अभिण्हं ओवदती ति |

राहुलसुत्तं निट्ठितं

२४
[१२. वंगीससुत्तं)


एवं मे सुतं | एकं समयं  भगवा आळवियं विहरति अग्गळवे चेतिये |
तेन खो पन समयेन आयस्मतो वंगीसस्स उपज्झायो निग्रोधकप्पो नाम थेरो अग्गळवे चेतिये अचिरपरिनिब्बुतो होति | अथं खो आयस्मतो वंगसिस्स रहोगतस्स पटिसल्लिनस्सं एवं चेतसो परिवितक्को उदपादि परिनिब्बुतो नु खो मे उपज्झायो उदाहु नो परिनिब्बुतोति | अथ खो आयस्मा वंगीसो सायण्हसमयं पटिसल्लाना वुट्टितो येन भगवा तेनुपसंकमि, उपसंकमित्वा भगवन्तं अभिवादेत्वा एकमन्तं निसीदि | एकमन्तं निसिन्नो खो आयस्मा वंगीसो भगवन्तं एतदवोच-इध-मय्हंमन्ते रहोगतस्स पटिसल्लिनस्स एवं चेतसो परिवितक्को उदपादि परिनिब्बुतो नु खो मे उपज्झायो, उदाहु नो परिनिब्बुतो ति | अथ खो आयस्मा वंगीसो उट्ठायासना एकंसं चीवंर कत्वा येन भगवा तेनऽज्जलिं. पणाम्त्वा भगवन्तं गाथाहि अज्झभासि ---

मराठीत अनुवाद :-

३४२. आणि अनियमित्त जें निर्वाण त्याचें चिंन्तन कर व अहंकाराची वासना सोड. अहंकाराचा त्याग केलास म्हणजे तूं शान्त होशील. (८)

याप्रमाणे भगवान् आयुष्यमान् राहुलाला या गाथांनीं वारंवार उपदेश करी.

राहुलसुत्त समाप्त

२४
[१२. वंगीससुत्त]


असें मीं ऐकलें आहे. एके समयीं भगवान् आळवी येथें अग्गाळव चैत्यांत राहत होता. त्या समयीं आयुष्यमान् वंगीसाचा उपाध्याय निग्रोधकप्प नांवाचा स्थविर अग्गाळव चैत्यांत नुकताच परिनिर्वाण
पावला होता. तेव्हां एकान्तांत विश्रांति घेता असतां आयुष्मान् वंगीसाच्या मनांत असा विचार आला कीं, माझा उपाध्याय (मरणोत्तर) परिनिर्वाण पावला, कीं परिनिर्वाण पावला नाहीं ? तेव्हां सायंकाळीं आयुष्मान् वंगीस आपल्या विश्रांतिस्थानापासून निघाला आणि भगवंतापाशीं आला; येऊन भगवन्ताला नमस्कार करून एका बाजूस बसला.

एका बाजूस बसून वंगीस भगवन्ताला म्हणाला, “ भदन्त, मी एकांतांत विश्रांतिस्थानीं असतां माझ्या मनांत असा विचार आला कीं माझा उपाध्याय परिनिर्वाण पावला, कीं परिनिर्वाण पावला नाहीं?” तेव्हां आयुष्यमान् वंगीस आसनावरून उठला व एका खांद्यावर चीवर करून भगवन्तासमोर हात जोडून भगवन्ताला गाथांनी म्हणाला -
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel