पाली भाषेत :-

३४७. ये केचि गत्था इध मोहमग्गा | अञ्ञाणपक्खा विचिकिच्छठाना तथागतं पत्वा न ते भवन्ति | चक्खुं हि एतं परमं नरानं ||५||

३४८. नो चे हि जातु पुरिसो किलेसे | वातो यथा अब्भघनं विहाने |
तमो वऽस्स निवुतोसब्बलोको | न जोतिमन्तोऽपि नरा तपेय्युं ||६||

३४९. धीरा१(१-१ सी. , म.-धीरा व.) च१(१-१ सी. , म.-धीरा व.) पज्जोतकरा भवन्ति | त त२( २ म.-यं.) अहं ३(३ अ.,म.-वीर.)धीर तथेव मञ्ञे |
विपस्सिनं जानमुपा४(४सी.-झानमुपागमम्ह.)गमम्ह | परिसासु नो अविकरोहिं कप्पं ||७||

३५०. खिप्पं गिरं एरय वग्गु वग्गु | हंसो ५(५ रो.-हंसा. व.)व पग्गय्ह सणिं निकूज६( ६ म.-सणिकं निकूजि.)|
बिन्दुस्सरेन सुविकप्पितेन | सब्बे व ते उज्जुगता सुणोम ||८||

मराठीत अनुवाद :-

३४७. इहलोकीं मोहाप्रत नेणार्‍या अज्ञान पक्षाला चिकटण्यार्‍या संशयस्थानरूपी ज्या ग्रंथी असतात. त्या तथागताकडे येणार्‍याच्या बाबतींत नाहींशा होतात. कारण तो मनुष्यांचे बाबतींत श्रेष्ठ डोळ्यासारखाच आहे. (५)

३४८. वारा जसा मेघपटल उडवून देतो, तद्वत् तुझ्यासारख्या पुरूषानें जर लोकांचे क्लेश दूर केले नाहींत, तर हा लोक (अज्ञानानें) झांकला जाऊन अंधकारमय होईल, व द्युतिमन्त मनुष्यही  प्रकाशणार नाहींत. (६)

३४९. बुद्धिवानं पुरुष प्रकाश देणारे होतात. हे धीर, तूंही तसाच आहेस असें मी समजतों. तूं दिव्यदृष्टि आहेस असें जाणून आम्ही तुजपाशीं आलों. (निग्रोध) कप्पाची काय गति झाली, हें या सभेंत आम्हां, सांग. (७)

३५०. हंस जसा सुंदर आणि स्पष्ट स्वरानें, मान उंट करून, सावकाश गान करतो, तसा तूं विलंब न लावतां गोड गोड वचन बोल. आम्ही सर्व सरळ (मानेनें) तुझें भाषण ऐकतों (८)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel