पाली भाषेत :-

४२२ उजुं जनपदो१(१ सी.—जानपदो) राजा हिमवन्तस्स पस्सतो।
धनविरियेन संपन्नो कोसलेसु निकेतिनो।।१८।।

४२३ आदिच्चा२(२ म.—आदिच्चो.) नाम गोत्तेन साकिया३(३ म.—साकियो.) नाम जातिया।
तम्हा कुला पब्बजितो (ऽम्हि राज) न कामे अभिपत्थयं।।१९।।

४२४ कामेस्वादीनवं दिस्वा नेक्खम्मं दट्ठु खेमतो।
पधानाय गमिस्सामि एत्थ मे रञ्ञति मनो ति।।२०।।

पब्बज्जासुत्तं निट्ठितं

२८
[२. पधानसुत्तं]


४२५ तं मं पधानपहितत्तं नदिं नेरञ्जरं पति।
विपरक्कम्म झायन्तं योगक्खेमस्स पत्तिया।।१।।

मराठीत अनुवाद :-

४२२. “हे राजा, येथून सरळ हिमालयाच्या पायथ्याशीं धनानें आणि शौर्यानें संपन्न अशा कोसल राष्ट्रांत राहणारे लोक आहेत. (१८)

४२३. ते लोक गोत्रानें आदित्य व जन्मत: शाक्य. त्या कुळांतून निघून मीं प्रव्रज्या घेतली, ती संपत्तीच्या इच्छेनें नव्हे.(१९)

४२४. विषयोपभोगांत दोष व नैष्काम्यांत निर्भयता पाहून मी तपाचरणासाठीं जात आहें. यांतच माझ्या मनाला आनंद वाटतो.”(२०)

पब्बज्जासुत्त समाप्त

२८
[२. पधानसुत्त]


४२५. त्या मला, नेरंजरा नदीच्या तीरीं योगक्षेम जें निर्वाण त्याच्या प्राप्तीसाठीं मी प्रयत्नांत गढून गेलों असतां, व अत्यंत दक्षतेनें ध्यान करीत असतां,(१)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel