पाली भाषेत :-

४२६ नमुची१(१ म.—नमुचि.) करुणं वाचं भासमानो उपागमि।
किसो त्वमसि दुब्बण्णो सन्तिके मरणं तव।।२।।

४२७ सहस्सभागो मरणस्स एकंसो तव जीवितं।
जीव२(२ प.—जीवं.) भो जीवितं सेय्यो जीवं पुञ्ञानि काहसि।।३।।

४२८ चरतों च ते ब्रह्मचरियं अग्गिहुत्तं च जूंहतो।
पहूतं चीयते पुञ्ञ किं पधानेन काहसि।।४।।

४२९ दुग्गो मग्गो पधानाय दुक्करो दुरभिसंभवो।
इमा गाथा भणं मारो अट्ठा बुद्धस्स सन्तिके।।५।।

मराठीत अनुवाद :-

४२६. नमुचि (मार) मजजवळ येऊन कारुणवाणीनें म्हणाला—“तूं कृश आणि दुर्वर्ण झाला आहेस; मरण तुझ्या जवळ आलें आहे.(२)

४२७. हजार वांट्यांनीं तूं मरणार; तुझ्या आयुष्याचा एक वांटा बाकी आहे. भो, तूं जिवन्त रहा; जगणें चांगलें; जगल्यानें तूं पुण्य करूं शकशील. (३)

४२८. ब्रह्मचर्याचें आचरण व अग्निहोत्राचें पालन केलें असतां तुला पुष्कळ पुण्य मिळेल. हा निर्वाणार्थ प्रयत्न करून काय फायदा?(४)

४२९. निर्वाणाच्या प्रयत्नाचा मार्ग कठिण, दुष्कर आणि दुष्प्राप्य आहे.” या गाथा म्हणून मार बुद्धासमोर उभा राहिला.(५)

पाली भाषेत :-

४३० तं तथावादिनं मारं भगवा एतदब्रवि१(१ सी.-एतदब्रुवि.)|
पमत्तबन्धु पापिम येनऽत्थेन इधागतो।।६।।

४३१ अणुमत्तेनऽपि पुञ्ञेन अत्थो मय्हं न विज्जति।
येसं च अत्थो पुञ्ञानं ते मारो वत्तुमरहति।।७।।

४३२ अत्थि सद्धा ततो२(२ म.-तपो.) विरियं पञ्ञा च मम विज्जति।
एवं मे पहितऽत्तंऽपि किं जीवमनुपुच्छसि३(३ म.-जीवमनुपुच्छथ.)।।८।।

४३३ नदीनमपि सोतानि अयं वातो विसोसये।
किं च४(४-४सी., म.-किंचि.) मे४ पहितऽत्तस्स लोहितं नूपसुस्सये।।९।।

मराठीत अनुवाद :-

४३०. तसें बोलणार्‍या त्या माराला भगवन् म्हणाला—“हे प्रमत्तबन्धु, पापी मारा, तूं कशासाठीं आलास (हें मीं जाणतों)(६)

४३१. मला त्या पुण्याच्या अणुमात्रेचीही जरूरी नाहीं. ज्यांना तसें पुण्य पाहिजे असेल, त्यांना माराने या गोष्टी सांगाव्यात.(७)

४३२. माझें ठायीं श्रद्धा आहे, उत्साह आहे आणि प्रज्ञा आहे. या प्रमाणें मी दृढचित्त असतां तूं मला ‘जग’ म्हणून का सांगतोस?(८)

४३३. माझ्या शरिरांतील हा (उत्साहरूपी) वारा नद्यांचें प्रवाहही शोषित करील; तर मग दृढचित्त असलेल्या माझें रक्त शोषित कसें न करील? (९)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel