पाली भाषेत :-

४३४ लोहिते सुस्समानम्हि पित्तं सेम्हं च सुस्सति।
मंसेसु खीयमानेसु मिय्यो चित्तं पसीदति।
भिथ्यो सति च पञ्ञा च समाधि मम तिट्ठति।।१०।।

४३५ तस्स मे वं विहरतो पत्तस्सुत्तमवेदनं
कामे नापेक्खते चित्तं पस्स सत्तस्स१(१ म.-सद्धस्स.) सुद्धतं।।११।।
४३६ कामा ते पठमा सेना दुतिया अरति वुच्चति।
ततिया खुप्पिपासा ते चतुत्थी तण्हा पवुच्चति।।१२।।

४३७ पञ्चमं थीनमिद्धं ते छट्ठा भूरुपवुच्चति।
सत्तमी विचिकिच्छा ते मक्खो थंभो ते अट्ठमो।।१३।।

४३८ लाभो सिलोको सक्करो मिच्छालद्धो च यो यसो।
यो चऽत्तान समुक्कंसे परे च अवजानति।।१४।।

मराठीत अनुवाद :-

४३४. रक्त शोषित झालें, म्हणजे पित्त आणि कफ शोषित होतात; आणि मांस क्षीण झालें म्हणजे माझें चित्त तर विशेषच प्रसन्न होतें, आणि माझी स्मृति, प्रज्ञा आणि समाधि अधिकतर स्थिर होतात.(१०)

४३५. याप्रमाणें उत्तम अनुभव प्राप्त करून घेऊन राहत असतां, माझें चित्त कामोपभोगांची अपेक्षा धरीत नाहीं. ही तूं सत्त्वशुद्धि पाहा.(११)

४३६. कामोपभोग ही तुझी पहिली सेना आहे. दुसरी अरति, तिसरी तहानभूक आणि चवथी तृष्णा;(१२)

४३७. पांचवी अनुत्साह व आळस, सहावी भीति, सातवी कुशंका, परगुणांबद्दल तिरस्कार आणि दुराग्रह आठवी.(१३)

४३८. लाभ, कीर्ति, सत्कार आणि खोट्या मार्गानें मिळविलेलें यश, ज्याच्या योगें मनुष्य आत्मस्तुति आणि परनिंदा करतो—(१४)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel