पाली भाषेत :-

४५४ यं बुद्धो भासती१(१म.-भासति.) वाचं खेमं निब्बाणपत्तिया।
दुक्खस्सऽन्तकिरियाय सा वे वाचानमुत्तमा ति।।५।।

सुभाषितसुत्तं निट्ठितं।

३०
[४. सुन्दरिकभारद्वा२जसुत्तं]( २अ.-पूरळाससुत्तं.)


एवं मे सुतं। एकं समयं भगवा कोसलेसु विहरति सुन्दरिकाय नदिया तीरे। तेन खो पन समयेन सुन्दरिकभारद्वाजो ब्राह्मणो सुन्दरिकाय नदिया तीरे अग्गिं जुहति, अग्गिहुत्तं परिचरति। अथ खो सुन्दरिकभारद्वाजो ब्राह्मणो अग्गिं जुहित्वा अग्गिहुत्तं परिचरित्वा,उट्ठायासना समन्ता चतुद्दिसा अनुविलोकेसि—को नु खो इमं हव्यसेसं भुञ्जेय्या ति। अद्दसा खो सुन्दरिकभारद्वाजो ब्राह्मणो भगवन्तं अविदूरे अञ्ञतरस्मिं रुक्खमूले ससीसं पारुपतं निसिन्नं, दिस्वान वामेन हत्थेन हव्य१सेसं(१म.-हब्य.) गहेत्वा, दक्खिणेन हत्थेन कमण्डलुं गहेत्वा येन भगवा तेनुपसंकमि। अथ खो भगवा सुन्दरिकभारद्वाजस्स ब्राह्मणस्स पदसद्देन सीसं विवरि। अथ खो सुन्दरिकभारद्वाजो ब्राह्मणो, मुण्डो अयं भवं, मुण्डको अयं भवं ति ततो व पुन निवत्तितुकामो अहोसि। अथ खो सुन्दरिकभारद्वाजस्स ब्राह्मणस्स एतदहसि-मुण्डाऽपि हि इधेकच्चे ब्राह्मणा भवन्ति, यन्नूनाहं उपसंकमित्वा जातिं पुच्छेय्यं ति। अथ खो सुन्दरिकभारद्वाजो ब्राह्मणो येन भगवा तेनुपसंकमि, उपसंकमित्वा भगवन्तं एतदवोच-किजच्चो भवं ति। अथ खो भगवा सुंदरिकभारद्वाजं ब्राह्मणं गाथाहि अज्झभासि—


मराठीत अनुवाद :-

४५४. निर्वाणप्राप्तीसाठीं व दु:खाचा अन्त करण्यासाठीं जी क्षेमकारक वाचा बुद्ध बोलतो, तीच सर्व वाचांत उत्तम वाचा होय.(५)

सुभाषितसुत्त समाप्त

३०
[४. सुन्दरिकभारद्वाजसुत्त]


असें मीं ऐकलें आहे. एके समयीं भगवान् कोसल देशांत सुंदरिका नदीच्या तीरीं राहत होता. त्या काळीं सुन्दरिक भारद्वाज ब्राह्मण सुन्दरिका नदीच्या तीरीं अग्निपूजा करीत होता व अग्निहोत्र पाळत होता. तेव्हां सुन्दरिक भारद्वाज ब्राह्मण अग्निची पूजा करून
व अग्निहोत्राचें काम आटोपून आणि आसनावरून उठून, हव्यशेष अन्न खाण्याला कोणी आहे कीं काय हें पाहण्यासाठी चारही दिशांना अवलोकन करूं लागला. तेव्हां सुन्दरिक भारद्वाज ब्राह्मणानें जवळच्या एका वृक्षाखालीं डोक्यावरून पांघरूण घेऊन बसलेल्या भगवंताला पाहिलें. पाहून डाव्या हातांत हव्यशेष अन्न घेऊन व उजव्या हातांत कमंडलु घेऊन तो भगवन्तापाशी आला. तेव्हां सुंदरिक भारद्वाज ब्राह्मणाचा पदशब्द ऐकून भगवन्तानें आपल्या डोक्यावरचें पांघरूण काढलें. तेव्हां, ‘अरे! हा तर मुण्ड आहे, मुंडक आहे!’ असें म्हणून सुंदरिक भारद्वाज ब्राह्मण तेथूनच मागें वळण्याचा विचार करूं लागला. पण सुंदरिक भारद्वाज ब्राह्मणाला असें वाटलें कीं, मुंडांपैकींही कांहीं ब्राह्मण असतात, तेव्हां सुंदरिक भारद्वाज ब्राह्मण भगवन्तापाशीं आला. येऊन भगवन्ताला म्हणाला—‘तू जन्मत: कोण आहेस?’ त्यावर भगवान् सुंदरिक भारद्वाज ब्राह्मणासा गाथांनीं बोलला—
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel