पाली भाषेत :-

४६९ यम्हि न माया वसती न मानो। यो वीतलोभो अममो निरासो।
पनुण्णकोधो अभिनिब्बुतत्तो। यो१(१रो.-सो.) ब्राह्मणो सोकमलं अहासि।
तथागतो अरहति पूरळासं।।१५।।

४७० निवेसनं यो मनसो अहासि। परिग्गहा यस्म न सन्ति केचि।
अनुपादियानो इध वा हुरं वा। तथागतो अरहति पूरळासं।।१६।।

४७१ समाहितो यो उदतारि ओघं। धम्मं चऽञ्ञासि परमाय दिट्ठिया।
खीणासवो अन्तिमदेहधारी। तथागतो अरहति पूरळासं।।१७।।

४७२ भवासवा यस्स वची खरा च। विधूपिता अत्थगता न सन्ति।
स वेदगू सब्बधि विप्पमुत्तो। तथागतो अरहति पूरळासं।।१८।।

मराठीत अनुवाद :-

४६९. ज्याच्या अन्त:करणांत माया किंवा अहंकार नाहीं, जो निर्लोभी, अमम, नि:स्पृह, विगतक्रोध व शान्त आहे,  ज्या ब्राह्मणानें शोकमलाचा त्याग केला आहे, असा तथागत पुरोडाश देण्याला योग्य होय.(१५)

४७०. मनाच्या वासना ज्यानें सोडल्या, ज्याला कसलाही परिग्रह नाहीं, व जो इहलोकाची किंवा परलोकाचीं आशा धरीत नाहीं, तो तथागत पुरोडाश देण्याला योग्य होय.(१६)

४७१. जो समाहित होत्साता ओघ तरून गेला, ज्यानें परमार्थ दृष्टीनें धर्म जाणला, तो क्षीणाश्रव, अन्तिमदेहधारी तथागत पुरोडाश देण्यास योग्य होय.(१७)

४७२. ज्याच्या संसारवासना व कठोर वाचा दग्ध आणि अस्तंगत होऊन नाहींशा झाल्या, तो वेदपारग, सर्वप्रकारें मुक्त तथागत पुरोडाश देण्याला योग्य होय.(१८)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel