पाली भाषेत :-

४९३     रागं चं दोसं च पहाय मोहं | खीणासवा वुसितब्रम्हाचरिया |
कालेन तेसु हव्यं पवेच्छे | यो ब्राम्हणो पुञ्ञऽपेक्खो यजेथ ||७||

४९४    येसु न माया वसति न मानो | ये१(१-१. खीणासवा वुसितब्रम्हचरिया |) वीतलोभा अममा निरासा१ |   
कालेन तेसु हव्यं पवेच्छे | यो ब्राम्हणो पुञ्ञऽपेक्खो यजेथ ||८||

४९५ ये वे न तण्हासु उपातिपन्ना | वितरेय्य ओघं अममा चरन्ति |
कालेन तेसु हव्य पवेच्छे | यो ब्राम्हणो पुञ्ञऽपेक्खो यजेथ ||९||

४९६  येसं२( २ रो. –येसं तु.) तण्हा नत्थि कुहिञ्चि लोके | भवाभवाय इध वा हुरं वा|
कालेन तेसु हव्यं पवेच्छे | यो ब्राम्हणो पुञ्ञऽपेक्खो यजेथ ||१०||

मराठीत अनुवाद :-

४९३.  जो ब्राम्हण पुण्याच्या अपेक्षेनें यज्ञ करील त्यानें, ज्यांनीं काम, राग, द्वेष आणि मोह साडून देऊन ब्रम्हचर्य़ पूर्णपणें पाळलें आहे. अशा क्षीणाश्रवांना योग्य वेळीं हव्य द्यावें. (७)

४९४.  जो ब्राम्हण पुण्याच्या अपेक्षेनें यज्ञ करील त्यांने, ज्यांच्या अंत:करणांत माया व अहंकार नाहीं, जे वीतलोभ, अमम व निस्तृष्ण, त्यांना योग्य वेळीं हव्य द्यावें. (८)

४९५. जो ब्राम्हण पुण्याच्या अपेक्षेनें यज्ञ करील त्यानें, जे तृष्णेंत फसलेले नाहींत; ओघ तरून जे अमम राहतात, त्यांना योग्य वेळी हव्य द्यावें. (९)

४९६.    जो ब्राम्हण पुण्याच्या अपेक्षेनें यज्ञ करील त्यानें, ज्यांना शाश्वत होण्यासाठीं किंवा उच्छेद पावण्यासाठी, इहलोकीं किंवा परलोकीं कोठेंहि नेण्यासाठी तृष्णा नाहीं, त्यांना योग्य वेळीं हव्य द्यावें. (१०)

पाली भाषेत :-


४९७  ये कामे हित्वा अगहा चरन्तिं | सुसञ्ञतऽत्ता तसरं व १(१ रो. उज्जु, म. –उजुं) उज्जुं |
कालन तेसु हव्यं पवेच्छे | यो ब्राम्हणो पुञ्ञऽपेक्खो यजेथ ||११||

४९८    ये वीतरागा सुसमाहितिन्द्रिया | चन्दो व राहुगहमा पमुत्ता |
कालेव तेसु हव्य पवेच्छे | यो ब्राम्हणो पुञ्ञऽपेक्खो यजेथ ||१२||

४९९  सिमिताविनो वीतरागा अकोपा | येसं गति नत्थि इध विप्पहाय |
कालेन तेसु  हव्यं पवेच्छे | यो ब्राम्हणो पुञ्ञऽपेक्खो यजेथ ||१३||

५००     जहेत्वा जातिमरणं असेसं | कथंकथं सब्बमुपातिवत्ता |
कालेन तेसु हव्यं पवेच्छे | यो ब्राम्हणो पुञ्ञऽपेक्खो यजेथ ||१४||

मराठीत अनुवाद :-

४९७. जो ब्राम्हण पुण्याच्या अपेक्षेनें यज्ञ करील त्यानें, जे कामोपभोगांचा त्याग करून सरळ धोटयाप्रमाणें सुसंयतात्मा गृहरहित फिरतात, त्यांना योग्य वेळीं हव्य द्यावें. (११)

४९८.    जो ब्राम्हण पुण्याच्या अपेक्षेनें यज्ञ करील त्यानें, जे वीतराग, सुसमाहितेन्द्रिय व राहुग्रहणापासून मुक्त झालेल्या चन्द्राप्रमाणें मुक्त आहेत, अशांना योग्य वेळीं हव्य द्यावें. (१२)

४९९.  जो ब्राम्हण पुण्याच्या अपेक्षेनें यज्ञ करील त्यानें, जे शंमितपाप, वीतराग व अकोप, ज्यांना इहलोक सोडल्यावर पुनर्जन्म नाहीं, त्यांना योग्य वेळीं हव्य द्यावें. (१३)

५००.  जो ब्राम्हण पुण्याच्या अपेक्षेनें यज्ञ करील त्यानें, जे अशेष जन्ममरण सोडून सर्व शंकांच्या पार गेले, त्यांना योग्य वेळीं हव्य द्यावें. (१४)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel