पाली भाषेतः-

५१८ किं पत्तिनमाहु ब्राह्मण (इति समियो) समणं केन कथं च न्हातको१ ति
नागो ति कथं पवुच्चति। पुट्ठो मे भगवा व्याकरोहि।।९।। (१ सी.-नहातको)

५१९ बाहेत्वा सब्बपापानि (सभिया ति भगवा)। विमलो साधुसमाहितो ठितऽत्तो।
संसारमतिच्च केवली सो। असितो तादि पवुच्चते स२ ब्रह्मा।।१०।। (२ अ.-सो.)

५२० समितावि पहाय पुञ्ञपापं। विरजो ञत्वा इमं परं च लोकं।
जातिमरणं उपातिवत्तो। समणो तादि पवुच्चते तथत्ता।।११।।

५२१ निन्हाय३(३ सी-निन्नहाय.) सब्बपापकानि। अज्झतं बहिद्धा च सब्बलोके।
देवमनुस्सेसु कप्पियेसु। कप्पं नेति तमाहु न्हातको ति।।१२।।

मराठी अनुवादः-

५१८. कोणत्या गुणाच्या प्राप्तीनें ब्राह्मण होतो-असें सभिय म्हणाला-श्रमण कसा होतो, स्नातक कसा होतो व नाग कोणाला म्हणतात हें, हे भगवन्, मी विचारतों, त्याचें मला उत्तर दे. (९)

५१९. सर्व पापांवर बहिष्कार घालून-हे सभिया, असें भगवान् म्हणाला-विमल, उत्तम रीतीनें समाहित, स्थितात्मा, संसाराचें अतिक्रमण करून केवली व अनाश्रित असा जो, त्याला ब्राह्मण म्हणतात. (१०)

५२०. पुण्यपापांचा त्याग करून शांत झालेला, इहपरलोक जाणून विगतरज झालेला आणि जन्म-मरणाच्या पार गेलेला जो, त्याला त्या गुणामुळें श्रमण म्हणतात.(११)

५२१. सर्व जगांत, बाह्य व अभ्यन्तरींचीं सर्व पापें धुवून काढून जो विकल्पबद्ध देवमनुष्यांत विकल्पाला जात नाहीं, त्याला स्नातक म्हणतात. (१२)

पाली भाषेतः-

५२२. आगुं न करोति किंचि लोके। सब्बसंयोगे विसज्ज बन्धनानि।
सब्बत्थ न सज्जति विमुत्तो। नागो तादि पवुच्चते१ (१सी.-पवुच्चति.) तथत्ता ति।।१३।।

अथ खो सभियो परिब्बाजको... पे.... भगवन्तं उत्तरिं पञ्हं पुच्छि—

५२३ कं खेत्तजिनं वदन्ति बुद्धा (इति सभियो)। कुसलं केन कथं च पंडितो ति।
मुनि नाम कथं पवुच्चति। पुट्ठो मे भगवा व्याकरोहि।।१४।।

५२४ खेत्तानि विचेय्य२(२ अ.-‘विजेय्य’ तिऽपि.) केवलानि (सभिया ति भगवा)। दि३ब्बं (३ रो.-दिव्यं.) मानुसकं च ब्रह्मखेत्तं।
सब्बखेत्तमूलबंधना पमुत्तो। खेत्तजिनो तादि पवुच्चते तथत्ता।।१५।।

मराठी अनुवादः-


५२२. जो या लोकीं कोणतेंही पाप (आगस्) करीत नाहीं, व सर्व संयोग व बंधनें सोडवून कोठेंही बद्ध होत नाहीं, विमुक्त होतो, त्याला त्या गुणामुळें नाग (न+आगस्) म्हणतात.(१३)

त्यावर सभिय परिव्राजकानें....इत्यादिक...भगवन्ताला आणखी प्रश्न विचारला—

५२३. बुद्ध क्षेत्रजिन कोणाला म्हणतात—असें सभिय म्हणतात—कुशल कसा होतो, पंडित कसा होतो, व मुनि कोणाला म्हणतात, हें मी विचारतों त्याचें, हे भगवन्, मला उत्तर दे. (१४)

५२४. दिव्य, मानवी आणि ब्रह्मक्षेत्र हीं सर्व क्षेत्रें जाणून—हे सभिया, असें भगवान् म्हणाला—जो सर्व क्षेत्रांच्या मूलबंधनापासून मुक्त झाला, त्याला त्या गुणांमुळें क्षेत्रजिन म्हणतात.(१५)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel