पाली भाषेतः-

५२५ कोसानि विचेय्य केवलानि। दिब्बं मानुसकं च ब्रह्मकोसं।
(सब्ब-) कोसमूलबंधना पमुत्तो। कुसलो तादि पवुच्चते तथत्ता।।१६।।

५२६ तदुभयानि१(१रो., म.-दुभयानि.) विचेय्य पण्डरानि। अज्झत्तं बहिद्धा च सुद्धिपञ्ञो।
कण्हं२(२ रो.-कण्हासुक्कं. अ.-कण्हसुक्कं.) सुक्कं उपातिवत्तो। पण्डितो तादि एवुच्चते तथत्ता।।१७।।

५२७ असतं च सतं च ञत्वा धम्मं। अज्झतं च बहिद्धा च सब्बलोके।
देवमनुस्सेहि पूजियो सो। संगं जालमतिच्च सो मुनी ति।।१८।।

५२८ किं पत्तिनमाहु वेदगुं (इति सभियो)। अनुविदितं केन कथं च विरियवा ति।
आजानियो किं ति नाम होति। पुट्ठो मे भगवा व्याकरोहि।।१९।।

मराठी अनुवादः-

५२५. दिव्य, मानवी आणि ब्रह्मकोश हे सर्व कोश जाणून, जो सर्व कोशांच्या मूलबंधनापासून मुक्त झाला, त्याला त्या गुणांमुळें कुशल म्हणतात.(१६)

५२६. आध्यात्मिक आणि बाह्य पंडरें (म्हणजे आयतनें) जाणून जो विशुद्धप्रज्ञ पापपुण्यांच्या पार जातो, त्याला त्या गुणांमुळें पंडित म्हणतात.(१७)

५२७. सर्व लोकीं अध्यात्मविषयक व बाह्यविषयक, साधूंचा व असाधूंचा, धर्म जाणून व संग-जालाच्या पार जाऊन जो देवमनुष्यांना पूज्य होतो, तो मुनि होय.(१८)

त्यावर सभिय परिव्राजकानें...इत्यादिक...भगवन्ताला आणखी प्रश्न विचारला—

५२८. कोणत्या गुणाच्या प्राप्तीनें वेदपारग म्हणतात—असें सभिय म्हणाला-अनुविदित कशामुळें होतो, वीर्यवान् कसा होतो व आजन्य कसा होतो, हें मी विचारतों त्याचें, हे भगवन्, मला उत्तर दे.(१९)

पाली भाषेतः-

५२९. वेदानि विचेय्य केवलानि (सभिया ति भगवा) समणानं यानिऽपत्थि ब्राह्मणानं।
सब्बवेदनासु वीतरागो। सब्बं वेदमत्तिच्च वंदगू  सो।।२०।।

५३० अनुविच्च पपंचनामरुपं। अज्झत्तं बहिद्धा च रोगमूलं।
सब्बरोगमूलबंधना पमुत्तो। अनुविदितो तादि पवुच्चते तथत्ता।।२१।।

५३१ विरतो इध सब्बपापकेहि। निरयदुक्खमतिच्च विरियवा सो।
सो विरियवा पधानवा। धीरो तादि पवुच्चते तथत्ता।।२२।।

५३२ यस्सऽस्सु लुतानि१(१म.-लुनानि.) बंधनानि। अज्झत्तं बहिद्धा च सब्बमुलं।
(सब्ब-) संगमूलबंधना पमुत्तो। आजानियो तादि पवुच्चते तथत्ता ति।।२३।।

मराठी अनुवादः-

५२९. जे श्रमणांचे किंवा ब्राह्मणांचे वेद असतील, ते सगळे जाणून—हे सभिया, असें भगवान् म्हणाला—व सर्व वेदांच्या पार जाऊन जो सर्व वेदनांविषयीं वीतराग होय.(२०)

५३०. बाह्य व अभ्यन्तरींच्या रोगाचें मूळ—प्रपंच व नामरूप जाणून जो सर्व रोगांच्या मूलबंधनांपासून मुक्त होतो, त्याला त्या गुणांमुळें अनुविदित म्हणतात.(२१)

५३१. जो इहरलोकीं सर्व पापांपासून विरत होतो व निरयदु:खाच्या पार जातो, तो वीर्यवान्. त्यालाच त्या गुणांमुळें वीर्यवान् प्रधानवान् आणि धीर म्हणतात.(२२)

५३२. आभ्यन्तरींचीं आणि बाहेरचीं, सर्वांचें मूळ असलेली संगकारणबंधनें तोडलीं जाऊन जो सर्व संगांच्या मूलबंधनांपासून मुक्त झाला, त्याला त्या गुणांमुळें आजन्य म्हणतात.(२३)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel