पाली भाषेतः-

५६२ इमं भोन्तो निसामेथ यथा भासति चक्खुमा।
सल्लकत्तो महावीरो सीहो व नदति वने।।१५।।

५६३ ब्रह्मभूतं अतितुलं मारसेनप्पमद्दनं।
को दिखा नप्पसीदेय्य अपि कण्हाभिजातिको।।१६।।

५६४ यो मं इच्छति अन्वेतु यो वा निच्छति गच्छतु।
इधाहं पब्बजिस्सामि वरपञ्ञस्सं सन्तिके।।१७।।

५६५ एतं चे रुच्चति भोतो सम्मासंबुद्धसासनं।
मयंऽपि पब्बजिस्साम वरपञ्ञस्स सन्तिके।।१८।।

५६६ ब्राह्मणा तिसता इमे याचन्ति पंजलीकता।
ब्रह्मचरियं चरिस्साम भगवा तव सन्तिके।।१९।।

मराठी अनुवादः-

५६२. सेल- सन्मित्रहो, हो चक्षुष्मान् काय बोलतो हें ऐका. हा शल्य काढणारा महावीर अरण्यांत सिंहाप्रमाणें गर्जना करीत आहे. (१५)

५६३. ब्रह्मभूत, अनुपम व मारसेनेचें मर्दन करणारा, अशा याला पाहून, नीच कुलांतील असला तरी कोण प्रसन्न होणार नाहीं? (१६)

५६४. जो मजबरोबर येऊं इच्छितो त्यानें यावें व जो येऊं इच्छित नाहीं त्यानें जावें; मी या श्रेष्ठप्रज्ञापाशीं येथेंच प्रव्रज्या घेतों. (१७)

५६५. विद्यार्थी-) आपणांला जर हा सम्यकसंबुद्धाचा पंथ आवडतो, तर आम्हीही या श्रेष्ठ-प्रज्ञापाशीं प्रव्रज्या घेतों. (१८)

५६६. हे भगवन्, हे आम्ही तीनशें ब्राह्मण हात जोडून याचना करीत आहोंत. तुझ्यापाशीं आम्ही ब्रह्मचर्य आचरूं इच्छितों. (१९)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel