पाली भाषेतः-

५६८ अग्गिहुत्तमुखा यञ्ञा सावित्ती छन्दसो मुखं।
राजा मुखं मनुस्सानं नदीनं सागरो मुखं।।२१।।

५६९ नक्खत्तानं मुखं चन्दो आदिच्चो तपतं मुखं।
पुञ्ञं आकंखमानानं संघो वे यजतं मुखं ति।।२२।।

अथ खो भगवा केणियं जटिलं इमाहि गाथाहि अनुमोदित्वा उट्ठाय आसना पक्कामि। अथ खो आयस्मा सेलो सपरिसो एको वूपकट्ठो अप्पमत्तो आतापी। पहितत्तो विहरन्तो न चिरस्सेव यस्सऽत्थाय कुलपुत्ता सम्मदेव अगारस्मा अनगारियं पब्बजन्ति तदनुत्तरं ब्रह्मचरिय परियोसानं दिट्ठे व धम्मे सयं अभिञ्ञा सच्छिकत्वा उपसंपज्ज विहासि। खीणा जाति, वुसितं ब्रह्मचरियं, कतं करणीयं, नापरं इत्थत्ताया ति अब्भञ्ञासि। अञ्ञतरो च खो पनायस्मा सेलो सपरिसो अरहतं अहोसि। अथ खा आयस्मा सेलो सपरिसो येन भगवा तेनऽञ्जलिं पणामेत्वा भगवन्तं गाथाहि अज्झभासि—

५७० यं तं सरणमागम्म इतो अट्ठमि चक्खुम१।(१ रो., सी.-चक्खुमा.)
सत्तरत्तेन भगवा दन्तम्ह तव सासने।।२३।।

५७१ तुवं बुद्धो तुवं सत्था तुवं माराभिभू मुनि।
तुवं अनुसये छेत्वा तिण्णो तारेसि मं पजं।।२४।।

५७२ उपधी ते समतिक्कन्ता आसवा ते पदालिता।
सीहोऽसि अनुपादानो पहीनभयभेरवो।।२५।।

मराठी अनुवादः-


५६८. यज्ञांत अग्निहोत्र प्रमुख, छन्दांत सावित्री प्रमुख, मनुष्यांत राजा प्रमुख, आणि नद्यांत सागर प्रमुख होय (२१)

५६९. नक्षत्रांत प्रमुख चन्द्र, प्रकाशणार्‍यांत सूर्य प्रमुख, व पुण्याची इच्छा धरून ज्यांना दान दिलें जातें, त्यांत संघ प्रमुख होय. (२२)

तेव्हां भगवान् केणिय जटिलाचें या गाथांनीं अनुमोदन करून आसनावरून उठून तेथून निघाला. तदनंतर आयुष्मान् सेल, आपल्या विद्यार्थ्यांसह एकाकी, एकांतवासी, सावधान, उत्साही व प्रहितात्मा असा राहून थोड्याच अवकाशांत ज्याच्यासाठीं कुलीन लोक घरांतून निघून अनागारिक प्रव्रज्या घेतात, तें अनुत्तर ब्रह्मचर्याचें पर्यवसान याच जन्मीं स्वत: जाणून साक्षात्कार करून घेऊन राहूं लागला. जन्म क्षीण झाला, ब्रह्मचर्य आचरिलें, कर्तव्य केलें व पुनरपि इहलोकीं येणें नाहीं हें त्यानें जाणलें आणि तो आयुष्मान् सेल आपल्या विद्यार्थ्यांसह अरहन्तांपैकी एक झाला. त्यावर आयुष्मान् सेल आपल्या विद्यार्थ्यांसह भगवन्तापाशीं आला: येऊन एका खांद्यावरून चीवर परिधान करून भगवन्ताला हात जोडून गाथांनीं बोलला—

५७०. हे चक्षुष्मन्, तुला शरण येऊन हा आठवा दिवस. हे भगवन्, सात दिवसांत आम्ही या तुझ्या पंथांत दान्त झालों आहोंत. (२३)

५७१. तूं बुद्ध आहेस, तूं शास्ता आहेस, तूं माराचा पराभव करणारा मुनि आहेस तूं अनुशय छेदून व उत्तीर्ण होऊन या लोकांना तारीत आहेस. (२४)

५७२. तूं उपाधि उल्लंघिली आहेस, तूं आश्रव तोडले आहेस. उपादानविरहित व भयभैरवविरहित असा तूं सिंह आहेस. (२५)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel