पाली भाषेतः-

६०८ न केसेहि न सीसेन न कण्णेहि न अक्खिहि।
न मुखेन न नासाय ओट्ठेहि भमूहि वा।।१५।।

६०९ न गीवाय न असेहि न उदरेन न पिट्ठिया।
न सोणिया न उरसा न संबाधे न मेथुने।।१६।।

६१० न हत्थेहि न पादेहि मांगुलीहि नखेहि वा।
न जंघाहि न ऊरूहि न वण्णेन सरेन वा।
लिंग जातिमयं नेव यथा अञ्ञासु जातिसु।।१७।।

६११ पच्चत्तं स-सरीरेसु मनुस्सेस्वेतं न विज्जति।
वोकारं च मनुस्सेसु समञ्ञाय पवुच्चति।।१८।।

६१२ यो हि कोचि मनुस्सेसु गोरक्खं उपजीवति।
एवं वासेट्ठ जानाहि कस्सको सो न ब्राह्मणो।।१९।।

मराठी अनुवादः-

६०८. केसांनीं, डोक्यानें, कानांनीं, डोळ्यांनीं, तोंडानें, नाकानें, ओठांनीं किंवा भिवयांनीं,(१५)

६०९. मानेनें, खांद्यांनीं, पोटानें, पाठीनें, कमरेनें, छातीनें, लिंगानें किंवा स्त्रीपुरुषसंगानें,(१६)

६१०. हातांनीं, पायांनीं, बोटांनीं किंवा नखांनीं, जंघांनीं१, (१. घोट्यापासून गुढघ्यापर्यंतचा भाग. २.६०१ गाथेवरील टीप पहा.) मांड्यांनीं, कांतीनें किंवा स्वरानें, जसा इतर जातींत जातिविशिष्ट आकार सांपडतो, तसा मनुष्यांत नाहींच नाहीं.(१७)

६११. हा जातिविशिष्ट आकार माणसा-माणसाच्या शरीरात भिन्नपणें आढळत नाहीं. मनुष्यजातींतील भेद हा केवळ वाक्-प्रचारावर अवलंबून असतो. (१८)

६१२. मनुष्यांत जो कोणी गाई राखून उपजीविका करतो तो, हे वासेष्ठा, शेतकरी आहे, ब्राह्मण नव्हे, असें समज.(१९)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel