पाली भाषेतः-

६४३ चुतिं यो वेदि सत्तानं उपपत्तिं च सब्बसो।
असत्तं सुगतं बुद्धं तमहं ब्रूमि ब्राह्मणं।।५०।।

६४४ यस्स गतिं न जानन्ति देवा गन्धब्बमानुसा।
खीणासवं अरहन्तं तमहं ब्रूमि ब्राह्मणं।।५१।।

६४५ यस्स पुरे च पच्छा च मज्झे च नत्थि किंचनं।
अकिंचनं अनादानं तमहं ब्रूमि ब्राह्मणं।।५२।।

६४६ उसभं पवरं १वीरं(१ म.-धीरं.) महेसिं विजिताविनं।
अनेजं नहातकं२(२ म.-न्हातकं.) बुद्धं तमहं ब्रूमि ब्राह्मणं।।५३।।

६४७ पुब्बे-निवासं यो वेदि सग्गापायं च पस्सति।
अथो जातिक्खयं पत्तो तमहं ब्रूमि ब्राह्मणं।।५४।।

मराठीत अनुवाद
:-

६४३. जो प्राण्याचें मरण व उत्पत्ति सर्वथैव जाणतो, जो अनासक्त, सुगत आणि बुद्ध, त्याला मी ब्राह्मण म्हणतों.(५०)

६४४. ज्याची गति देवांना, गंधर्वांना किंवा मनुष्यांना माहीत नाहीं, जो क्षीणाश्रव, अर्हन्, त्याला मी ब्राह्मण म्हणतों.(५१)

६४५. ज्याला पूर्व पदार्थांविषयीं, भावी पदार्थांविषयीं, किंवा वर्तमान पदार्थांविषयीं कांहीच वासना नाहीं, जो अकिंचन व आदानरहित, त्याला मी ब्राह्मण म्हणतों.(५२)

६४६. ऋषभ, प्रवर, वीर, महर्षि, विजयी, अप्रकम्प्य, स्नातक आणि बुद्ध, त्याला मी ब्राह्मण म्हणतों.(५३)

६४७. जो पूर्वजन्म स्मरतो, सद्गति आणि असद्गति घेतो, त्याला मी ब्राह्मण म्हणतों.(५४)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel