पाली भाषेत :-

४६

[८. पसूरसुत्तं]

८२४ इधेव सुद्धि१(१ Fsb., सी.-सुद्धि.) इति वादियन्ति२(२ म.-वादयन्ति.)। नाञ्ञेसु३ धम्मेसु विसुद्धिमाहु।(३ म.-नञ्ञेसु.)
यं निस्सिता तत्थ सुभं४(४ नि.-सुभा.) वदाना। पञ्चेकसच्चेसु पुथू निविट्ठा।।१।।

८२५ ते वादकामा परिसं विगय्ह। बालं दहन्ति५(५ म.-हरन्ति.) भिथु अञ्ञमञ्ञं।
वदेन्ति६(६ म., नि.-वदन्ति.) ते अञ्ञसिता कथोज्जं। पसंसकामा कुसला वदाना।।२।।

८२६ युत्तो कथायं७(७ सी.-य.) परिसाय मज्झे। पसंसमिच्छं विनिघाति होति।
अपाहतस्मिं पन मंकु होति। निन्दाय सो कुप्पति रन्धमेसी।।३।।

मराठीत अनुवाद :-

४६
[८. पसूरसुत्त]


८२४ लोक आपापल्या पंथांतच शुद्धि आहे असें प्रतिपादन करतात, व इतर पंथांत शुद्धि नाहीं असें म्हणतात. ज्या पंथाचा आश्रय करतात, त्यांतच श्रेय आहे असें म्हणणारे ते निरनिराळ्या पंथांत बद्ध होतात.(१)

८२५ ते वाद करण्याच्या इच्छेनें सभेंत जाऊन परस्पर परस्परांना मूर्ख ठरवितात. ते अन्यतर पंथांत बद्ध झालेले व आपणांस वादांत कुशल म्हणविणारे प्रशंसेच्या इच्छेनें वादविवाद करतात.(२)

८२६ सभेमध्यें वादांत गुंतला असतां तो प्रशंसेच्या इच्छेनें दुसर्‍यावर (वाणीचे) घाव घालणारा होतो; पण वादांत पराजित झाला तर खजील होतो; आणि निंदा झाली तर रागावतो व दुसर्‍याचें वर्म शोधतो.(३)

पाली भाषेतः-


८२७ यमस्स वादं परिहीनमाहु। अपाहतं पञ्हवीमंसकासे१।(१ म., Fsb., सी.-पञ्हवि; सी. Fsb-सका ये.)
परिदेवति२(२ Fsb.-ती.) सोचति हीनवादो। उपच्चगा मं ति अनुत्थुणाति३।।४।।(३ सी., म., Fsb- नाति.)

८२८ एते विवादा समणेसु जाता। एतेसु उग्धाति४(४ म.-टि.) निघाति४ होति।
एतंऽपि५(५ सी.-एवं.) दिस्वा विरमे कथोज्जं। न हञ्ञदत्थत्थि पसंसलाभा।।५।।

८२९ पसंसितो वा पन तत्थ होति। अक्खाय वादं परिसाय मज्झे।
सो हस्सति६(६ Fsb-ती, म.-हंसति.) उण्ण७मतिच्च(७ भ.-ती च) तेन। पप्पुय्य तमत्थं८(८ Fsb.-तं अत्थं.म.-तमत्थ.) यथामनो अहु९।।६।।(९ रो.-हू.)

मराठी अनुवादः-

८२७. तेथें जे परीक्षक असतील, ते जर ‘याचा मुद्दा खोटा आहे व तो खोडून काढला गेला’ असें म्हणाले, तर हा वादांत हरलेला परिदेव आणि शोक करतो आणि प्रतिपक्ष्यानें आपणावर जय मिळविला म्हणून चडफडतो.(४)

८२८ अशा रीतीनें श्रमणांमध्यें विवाद उत्पन्न होतात, व त्यांत हा दुसर्‍यावर आघात करतो किंवा आपण आघात पावतो. म्हणून हा प्रकार पाहून विवादापासून निवृत्त व्हावें. कारण त्यांत प्रशंसेच्या लाभाशिवाय दुसरा कोणताच फायदा नाहीं.(५)

८२९ सभेमध्यें आपला मुद्दा मांडून कधीं कधीं तो तेथें प्रशंसा पावतो, व तेणेकरून हर्षित होतो व वर डोकें करून चालतो. तसा जय मिळवून तो परिपूर्ण-मनोरथ होतो.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel