पाली भाषेत :-

८८३ यमाहु सच्चं तथियं ति एके। तमाहु अञ्ञे तुच्छं मुसा ति।
एवंऽपि विग्गय्ह विवादियन्ति१। कस्मा न एकं समणा वदन्ति।।६।। (१ म.-विवादयन्ति.)

८८४ एकं हि सच्चं न दुतियमत्थि। यस्मिं पजा नो विवदे पजानं।
नाना ते सच्चानि सयं थुनन्ति। तस्मा न एकं समणा वदन्ति।।७।।

८८५ कस्मा नु सच्चानि वदन्ति नाना। पवादियासे कुसला वदाना।
सच्चानि सुतानि२ बहूनि नाना। उदाहु ते तक्कमनुस्सरन्ति।।८।। (२ रो-सु तानि.)

८८६ न हेव सच्चानि बहूनि नाना। अञ्ञत्र सञ्ञाय निच्चानि लोके।
तक्कं च दिट्ठिसु  पकप्पयित्वा। सच्चं मुसा ति द्वयधम्ममाहु।।९।।

मराठी अनुवाद :-


८८३ कित्येक जें तथ्य आणि सत्य म्हणतात, तें दुसरे तुच्छ आणि खोटें म्हणतात, व याप्रमाणें वाद करून विवाद माजवितात. हे श्रमण एकच सत्य कां प्रतिपादीत नाहींत? (६)

८८४ सत्य एकच आहे, दुसरें नाहीं, ज्याविषयीं समंजस लोक आपसांत विवाद करणार नाहींत. पण श्रमण सत्यें अनेक अशी बढाई मारतात, आणि म्हणून ते ‘सत्य एक’ असें म्हणत नाहींत. (७)

८८५ ते आपणाला कुशल समजणारे वादी अनेक सत्यें आहेत असें कां म्हणतात? खरोखरच सत्यें पुष्कळ आणि अनेक आहेत असें परंपरागत आहे काय? कां ते नुसता तर्कच करीत असतात? (८)

८८६ जगांत सत्यें पुष्कळ आणि अनेक नाहींतच. संज्ञेशिवाय (स्वत:च करून घेतलेल्या कल्पनेशिवाय) त्यांत नित्य असें कांहीं नाहीं. सांप्रदायिक मतांत तर्क चालवून सत्य आणि असत्य या दोन गोष्टी ते प्रतिपादीत असतात. (९)

पाली भाषेत :-

८८७ दिट्ठे सुते सीलवते मुते वा। एते१ च१ निस्साय विमानदस्सी।(१-१ नि.-एतेसु.)
विनिच्छये ठत्वा पहस्समानो२। बालो परो अकुसलो३ ति चाह।।१०।।(२ नि.-पहंसमानो. ३नि.-अक्कुसलो.)

८८८ येनेव बालो ति परं दहाति। तेनातुमानं कुसलो ति चाह।
सयमत्तना सो कुसलो वदानो। अञ्ञं विमानेति तथेव४ पावा४।।११।। (४-४ नि.-तदेव पावद.)

८८९ अतिसरं५ दिट्ठिया सो समत्तो। मानेन मत्तो परिपुण्णमानी।(५ नि०अतिसारदिट्ठिया.)
सयमेव सामं मनसाऽभिसित्तो। दिट्ठि हि तस्स तथा समत्ता।।१२।।

८९० परस्स चे हि वचसा निहीनो। तुमो६ सहा होति निहीनपञ्ञो। (६ नि.-तुम्हो.)
अथ चे सयं वेदगू होति धीरो। न कोचि बालो समणेसु अत्थि।।१३।।

मराठीत अनुवाद :-

८८७. दुष्ट, श्रुत, शील, व्रत किंवा अनुमित यांतच अहंकाराचा नाश (म्हणजे शुद्धि) आहे असें जाणून व ठाम मत करून तो हर्षित होतो, आणि दुसरा मूर्ख व अकुशल आहे असें म्हणतो. (१०)

८८८ ज्या (सांप्रदायिक मताला चिकटून राहण्याच्या) गोष्टीमुळें तो दुसर्‍याला मूर्ख ठरवतो त्याचमुळें आपणाला कुशल म्हणतो. स्वत: आपणाला कुशल म्हणवतो, परक्याचा तिरस्कार करतो व त्याप्रमाणेंच बोलतो. (११)

८८९ आपल्या मतांत अत्यंत सार आहे अशा विचारानें तो फुगलेला, मानानें मत्त आणि परिपूर्णमानी होतो, व आपल्या मनानेंच आपणाला अभिषेक करून घेतो. कां कीं, ती सांप्रदायिकता त्यानें तशा रीतीनेंच स्वीकारलेली असते. (१२)

८९० दुसर्‍याच्या वचनानें जर हीनबुद्धि ठरतो, तर तो (दुसर्‍याला हीनबुद्धि ठरविणारा) त्याच्या बरोबरच स्वत:ही हीनबुद्धि ठरतो; आणि जर आपल्याच मतें आपण वेदपारग आणि सुज्ञ ठरतो, तर मग श्रमणांमध्यें मूर्ख असा कोणीच राहणार नाहीं. (१३)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel