पाली भाषेत :-

८९८ सीलुत्तमा संयमेनाहु सुद्धिं। वतं समादाय समुट्ठितासे।
इधेव सिक्खेम अथऽस्स सुद्धिं। भवूपनीता कुसला वदाना।।४।।

८९९ स चे चुतो सीलवतातो१ होति। स२ वेधति कम्मं विराधयित्वा।(१ नि.-सीलवततो.) (२म.-पवेदति, नि.-पवेधति.)
स३ जप्पति पत्थयतीध४ सुद्धिं। सत्था व५ हीनो पवसं घरम्हा।।५।।(३-४ नि.-पजप्पति पत्थयतिच्च.) (५म.-सत्था विहीनो.)

९०० सीलब्बतं वा पि पहाय सब्बं। कम्मं च सावज्जऽनवज्जमेतं।
सुद्धिं असुद्धिं ति अपत्थयानो। विरतो चरे सन्तिमनुग्गहाय।।६।।

मराठी अनुवाद :-

८९८. शील हेंच उत्तम समजणारे व व्रताचरणांतच मोठेपणा मानणारे संयमानेंच शुद्धि होते असें म्हणतात. ते भवांत बद्ध झालेले व आपणास कुशल म्हणविणारे म्हणतात कीं, याच पंथांत शुद्धि मिळत असल्याचें आम्ही शिकतों; व (४)

८९९ (अशीं व्रतें आचरणारा) तो जर आपल्या शीलव्रतापासून च्युत झाला तर आपलें कर्तव्य चुकलें म्हणून कंपित होतो. घर सोडून सार्थाच्या (तांड्याच्या) समूहासह प्रवास करणारा माणूस सार्थापासून मागें पडला असतां (जसा सार्थसमूहांत जाण्याकरितां) काकुळतीनें याचना करतो, तसा हा आपली शुद्धि करून घेण्याकरितां काकुळनें याचना करतो (५)

९०० पण सर्व शीलव्रतें व वाईट आणि बरें कर्म सोडून शुद्धीची आणि अशुद्धीची आस्था न बाळगतां माणसानें (दृष्टीमुळें प्राप्त होणार्‍या कल्पित) शान्तीचा१ (१ टीकाकार ‘शान्ति’ शब्दाचा अर्थ ‘दृष्टि’ असाच करतो. त्यानें ‘कोणतीहि दृष्टि न पकडतां’ असाच अर्थ दिला आहे. ‘निद्देस’ ह्या जुन्या अट्ठकथेंतही असाच अर्थ आहे.) लाभ न होतांही विरक्त होऊन राहावें. (६)

पाली भाषेत :-

९०१ तपूपनिस्साय१ जिगुच्छितं वा। अथ वाऽपि दिट्ठं व सुतं मुतं वा।(१ म.तमुपनिस्साय.)
उद्धंसरा सुद्धमनुत्थुनन्ति । अवीततण्हासे भवाभवेसु।।७।।

९०२ पत्थयमानस्स हि जप्पितानि। संवेधितं२ २वाऽपि पकप्पितेसु। (२-२सी. संवेदितं चापि)
चुतूपपातो इध यस्स नत्थि। स केन वेधेय्य कुहिं३ पजप्पे३।।८।। (३-३ रो. कुहिं च )

९०३ यमाहु धम्मं परमं ति एके। तमेव हीनं ति पनाहु अञ्ञे।
सच्चो नु वादो कतमो इमेसं। सब्बे व हीमे कुसला वदाना।।९।।

९०४ सकं हि धम्मं परिपुण्णमाहु । अञ्ञस्स धम्मं पन हीनमाहु ।
एवंऽपि विग्गय्ह विवादियन्ति४। सकं सकं सम्मुतिमाहु सच्चं।।१०।। (४ नि.-विवादयन्ति.)

मराठी अनुवाद :-

९०१. तप, जिगुप्सित (एक प्रकारचें तप), दृष्ट, श्रुत, किंवा अनुमित यांवर अवलंबून शुद्धि आहे असें ते निरनिराळ्या भवाविषयीं सतृष्ण राहून मोठ्या कंठरवानें प्रतिपादितात. (७)

९०२ याचना करणार्‍याच्या ठिकाणीं काकुळतीची भाषा असते, आणि कल्पिलेल्या वस्तूंमध्यें तो कम्प पावतो. पण ज्याला च्युति आणि उत्पत्ति राहिली नाहीं, तो कशानें कंप पावणार व कोठून काकुळणार? (८)

९०३ ज्याला कित्येक परमधर्म म्हणतात, त्यालाच दुसरे हीनधर्म म्हणतात. हे सर्वच आपणाला कुशल म्हणवतात, तेव्हां त्यांपैकीं कोणाचा वाद खरा? (९)

९०४ आपला धर्म परिपूर्ण आणि दुसर्‍याचा धर्म हीन असें ते म्हणतात. याप्रमाणें वाद करून ते विवाद माजवितात आणि आपापणांस संमत असलेली दृष्टिच सत्य म्हणतात. (१०)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel