पाली भाषेत :-

९३० न च कत्थिता सिया भिक्खु । न च वाचं पयुतं१ भासेय्य। (१म.-पयुत्तं.)
पागब्भियं न सिक्खेय्य। कथं विग्गाहिकं न कथयेय्य।।१६।।

९३१ मोसवज्जे न निय्येथ। संपजानो सठानि न कयिरा।
अथ जीवितेन पञ्ञाय। सीलब्बतेन नाञ्ञमतिमञ्ञे।।१७।।

९३२ सुत्वा रुसितो२ बहुं वाचं२। समणानं पुथुवचनानं। (२-२ नि.-दूसितो बहुवाच.)
फरुसेन ते न पतिवज्जा। न हि सन्तो पटिसेनिकरोन्ति३।।१८।। (३ नि.-पटिसेनि.)

९३३ एतं च धम्ममञ्ञाय। विचिनं भिक्खु सदा सतो सिक्खे।
सन्ती ति निब्बुतिं ञत्वा। सासने गोतमस्स नप्पमज्जेय्य।।१९।।

मराठीत अनुवाद :-


९३० भिक्षूनें आत्मश्लाघायुक्त बडबड करणारा होऊं नये, (दान-) सूचक वाक्य बोलूं नये, प्रगल्भता करूं नये, आणि वादविवादांत पडूं नये. (१६)

९३१ त्यानें असत्य भाषण करूं नये, लोक ठकविले जातील असें बुद्धिपूर्वक आचरण करूं नये, आणि आपल्या सदाचारानें, प्रज्ञेनें, शीलानें आणि व्रतानें दुसर्‍याची अवहेलना करूं नये. (१७)

९३२ इतर श्रमण याला निरनिराळ्या वचनांनीं (राग आणूं पाहत असतां) यानें त्यांचें भाषण ऐकून रुष्ट होऊन कठोर वचनानें त्यांचा प्रतिकार करूं नये. कां कीं, सन्तजन प्रतिकारबुद्धि बाळगीत नसतात. (१८)

९३३ भिक्षूनें हा धर्म जाणून व स्मृतिमान् होऊन तो सदोदित शिकावा. शान्ति हेंच निर्वाण असें जाणावें व त्यानें गोतमाच्या पंथांत बेसावधपणें वागूं नयें. (१९)

पाली भाषेत :-

९३४ अभिभू हि सो अनभिभूतो। सक्खिधम्मं अनीतिहमदस्सी१। (१ नि.-अद्दसि.)
तस्मा हि तस्स भगवतो। सासने अप्पमत्तो सदा नमस्समनुसिक्खे ति (भगवा ति)।।२०।।

तुवट्टकसुत्तं निट्ठितं।

मराठीत अनुवाद :-

९३४ तो (भगवान्) जयशाली पण अजिंक्य, आणि परंपरागत नसून (अनीतिह१)( प्र१  ‘अन्+इति+ह’ - अशी ह्या शब्दाची व्युत्पत्ती घेतली पाहिजे. याच्या उलट ‘इतिहीतिह (इति+ह+इति+ह)’ असा शब्द गाथा १०८४, ११३५ मध्यें आला आहे. ‘अनीतिह’ ह्या शब्दांतील ‘नी’ केवळ छंदाकरितां दीर्घ केलेला दिसतो. पुढें गाथा १०५३ व १०६६ पहा. ‘प्रत्यक्ष’, ‘आत्मप्रत्यक्ष’ असा अर्थ टीकाकारानें दिला आहे.)प्रत्यक्ष फल देणारा असा धर्म जाणणारा, म्हणून त्या भगवन्ताला नमस्कार करून त्याच्या पंथांत सदोदित सावधपणें वागण्यास शिकावें. (२०)

तुवट्टकसुत्त समाप्त
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel