पाली भाषेत :-

५३
[१५. अत्तदण्डसुत्तं]


९३५ अत्तदण्डा भयं जातं जनं पस्मथ मेघकं१। (१ नि. म.-मेघगं.)
संवेग कित्तयिस्सामि यथा संविजितं२ मया।।१।। (२ सी.-संविदितं.)

९३६ फन्दमानं पजं दिस्वा मच्छे अप्पोदके यथा।
अञ्ञमञ्ञेहि व्यारुद्धे दिस्वा मं भयमाविसि।।२।।

९३७ समन्तमसरो३ लोको दिसा सब्बा समेरिता। (३ नि., म.-समन्तमसारो.)
इच्छं भवनमत्तनो नाद्दसासिं४ अनोसितं।।३।। (४ नि.-नाद्दसामि.)

मराठीत अनुवाद :-

५३
[१५. अत्तदण्डसुत्त]

९३५ हातीं धारण केलेल्या दण्डापासून१ (१ पुढील अर्थ टीकेला अनुसरून दिलेला आहे-‘स्वत:च्या दुश्चरितांमुळें भय उत्पन्न झालें आहे.’) भय उत्पन्न झालें आहे. परस्परांशीं कलह करणार्‍या लोकांकडे पहा. ज्या योगें मला संवेग प्राप्त झाला तो संवेग मी (आतां) सांगतों. (१)

९३६ थोड्या पाण्यांत तडफडणार्‍या माशांप्रमाणें परस्परांशीं विरोध करून तडफड करणार्‍या लोकांना पाहून माझ्या अंत:करणांत भय शिरलें.(२)

९३७ हें सभोंवतीचें जग असार आहे व सर्व दिशा कंपित होत आहेत, (असें मला वाटूं लागलें). यांत माझ्यासाठीं निवार्‍याची जागा शोधीत असतां ती मला कोठेंच मोकळी आढळेना. (३)

पाली भाषेत :-

९३८ ओसाने त्वेव व्यारुद्धे दिस्वा मे अरति अहु।
अथेत्थ सल्लमद्दाक्खिं दुद्दसं हदयनिस्सितं१।।४।। (१ नि.-हदयं सितं.)

९३९ येन सल्लेन ओतिण्णो दिसा सब्बा विधावति।
तमेव सल्लं अब्बुय्ह न घावति निसीदति२।।५।। (२ नि.-न सीदती.)

९४० तत्थ सिक्खानुगीयन्ति (यानी लोके गथितानि) न तेसु पसुतो सिया।
निब्बिज्झ सब्बसो कामे सिक्खे निब्बाणमत्तनो।।६।।

९४१ सच्चो सिया अप्पगब्भो अमायो रित्तपेसुणो।
अक्कोधनो लोभपापं वेविच्छं वितरे मुनि।।७।।

मराठीत अनुवाद :-

९३८ शेवटपर्यंत (मरणाच्या दारीं असतांनाही) हे लोक भांडत आहेत, हें पाहून मला जगाचा अत्यंत कंटाळा आला, तेव्हां आपल्याच हृदयांतील दुर्दर्श असें शल्य मला दिसलें—(४)

९३९ ज्या शल्यानें विद्ध झाला असतां माणूस सर्व दिशांना धांवपळ करतो, पण तें बाहेर काढलें असतां तो धांवपळ न करतां एका जागीं स्थिर होतो. (५)

९४० त्यासाठीं शिकवण (शिक्षा) सांगितली जाते—जगांत ज्या ग्रन्थी आहेत त्यांत बद्ध होऊं नये. कामोपभोगांपासून सर्वथा विरक्त होऊन आपणाला निर्वाण कसें मिळेल हें शिकावें. (६)

९४१ मुनीनें सत्यप्रिय, अप्रगल्भ, अमायावी आणि चाहाडीपासून मुक्त व्हावें. आणि अक्रोधन होऊन लोभ, पाप आणि विवेत्सा१ (१ टीकाकार ‘मात्सर्य’ असा अर्थ देतो.) (हांवरेपणा) तरून जावें. (७)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel