पाली भाषेत :-

९६२ कं सो सिक्खं समादाय एकोदि१ निपको सतो। (१ म.-एकोधि.)
कम्मारो रजतस्सेव निद्धमे मलमत्तनो।।८।।

९६३ विजिगुच्छमानस्स यदिदं फासु (सारिपुत्ता ति भगवा)। सयनं रित्तासनं सेवतो चे।
संबोधिकामस्स यथानुधम्मं। तं ते पवक्खामि यथा पजानं।।९।।

९६४ पञ्चन्न२ धीरो भयानं न भाये। भिक्खु सतो सपरियन्तचारी।(२ नि.-पञ्चन्न.)
डंसाधिपातानं सिरिंसपानं३। मनुस्सफस्सानं चतुप्पदानं।।१०।। (३ नि.-सरसिपानं )

९६५ परधम्मिकानं न सन्तसेय्य। दिस्वाऽपि तेसं बहुभेरवानि।
अथापरानि अभिसंभवेय्य। परिस्सयानि कुसलानुएसी।।११।।

मराठीत अनुवाद :-

९६२ सोनार जसा रुपें आगींत घालून, त्यांतील हीणकस काढून टाकतो, त्याप्रमाणें समाहित, हुशार आणि स्मृतिमान् भिक्षूनें कोणती शिक्षणपद्धति ग्रहण करून आपल्या मनाचा मळ जाळून टाकावा? (८)

९६३ संसाराला उबगलेल्या - हे शारिपुत्रा, असें भगवान् म्हणाला—व एकांतवास सेवन करणार्‍या संबोधिपरायण अशा तुला, जें सुखकर तें, मी जसें जाणतों तसें, धर्माला अनुसरून, सांगतों. (९)

९६४ एकान्तवासांत राहणार्‍या स्मृतिमान् सुज्ञ भिक्षूनें पांच भयांना भिऊ नये :—डासांच्या चावण्याला, सर्पांना, मनुष्यांच्या त्रासाला, चतुष्पादांना, (१०)

९६५ आणि परधर्मिकांचीं पुष्कळ भेसूर कृत्यें पाहून देखील त्यांना घाबरूं नये. आणि त्या कुशलान्वेषी भिक्षूनें दुसरींही विघ्नें सहन करावींत. (११)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel