पाली भाषेत :-

५६
[२. अजितमाणवपुच्छा]


१०३२ केनस्सु निवुतो लोको (इच्चायस्मा अजितो) केनस्सु नप्पकासति।
किस्साभिलेपनं१(१सी.-किस्साभिसेचनं.) ब्रूसि किं सु तस्स महब्भयं।।१।।

१०३३ अविज्जाय निवुतो लोको (अजिता ति भगवा) वेविच्छा२(२म., सी.-विविच्छा, वेवच्छा.) पमादा नप्पकासति।
जप्पाभिलेपनं ब्रूमि दुक्खं अस्स महब्भयं।।२।।

१०३४ सवन्ति सब्बधी सोता (इच्चायस्मा अजितो) सोतानं किं निवारणं ।
सोतानं संवरं ब्रूहि केन सोता पिथिय्यरे३(३म.-पिधिय्यरे.)।।३।।

५६
[२. अजितमाणवपुच्छा (१)]

मराठीत अनुवाद :-


१०३२. हें जग कशानें झांकले जातें - असें आयुष्मान् अजित म्हणला - तें कशामुळें प्रकाशत नाहीं, याचें अभिलेपन कोणतें म्हणतोस? आणि याला भय कोणतें? (१)

१०३३. जग अविद्येनें झांकलें गेलें आहे — हे अजिता, असें भगवान् म्हणाला — विवित्सेमुळें१ (१. ९४१ व्या गांथेंतील ह्या शब्दाचा अर्थ व त्यावरील टीप पहा.) आणि प्रमादामुळें तें प्रकाशत नाहीं; काकुळतीची२ (टीकाकार ‘तृष्णा’ असा अर्थ करतो.) याचना हें त्याचें अभिलेपन, आणि दु:ख हें त्याला मोठें भय होय असें मी म्हणतों. (२)

१०३४ सर्वत्र प्रवाह वाहत आहेत — असें आयुष्मान् अजित म्हणाला - त्या प्रवाहांचें निवारण कोणतें? प्रवाहांचें नियमन कोणतें तें सांग, व ते प्रवाह कशामुळें बंद होतात? (३)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel