पाली भाषेत :-

१०५४ तं चाहं अभिनन्दामि महेसी१(१ सी.-सिं.) धम्ममुत्तमं।
यं विदित्वा सतो चरं तरे लोके विसत्तिकं ।।६।।

१०५५ यं२(२ म.-न यं किञ्चि.) किञ्चि संपजानासि३(३ म.-संजानासि ।) (मेत्तगू ति भगवा)। उद्धं अधो तिरियं ४(४म.- वाऽपि.)चापि मज्झे। 

एतेसु ५(५ म. - निन्दं.)नन्दिं च निवेसनं च। पनुज्ज विञ्ञाणं भवे न तिट्ठे।।७।।

१०५६ एवं-विहारी सतो अप्पमत्तो। भिक्खु चरं हित्वा ममायितानि।
जातिजरं सोकपरिद्दवं च। इधेव विद्वा पजहेय्य दुक्खं।।८।।

१०५७ एताभिनन्दामि वचो महेसिनो। ६(६सी.-सुकित्तिकं ।)सुकित्तितं गोतमऽ ७ (७ Fsb.-गोतम नूपधीकं । )नूपधीकं।
अद्धा हि भगवा पहासि दुक्खं। तथा हि ते विदितो एस धम्मो।।९।।

मराठीत अनुवाद :-

१०५४ हे महर्षे, ज्याचें ज्ञान मिळवून, स्मृतिमान् होऊन वागणारा मनुष्य, या जगांत तृष्णेच्या पार जातो, त्या उत्तम धर्माचें मी अभिनंदन करतों.(६)

१०५५ जें कांहीं तूं — हे मेत्तगू, असें भगवान् म्हणाला — वर, खालीं, चौफेर आणि मध्यें जाणशील, त्या संबंधींची तृष्णा, दृष्टि आणि विज्ञान दूर सारून कोणत्याही भवावर अवलंबून राहूं नयें. (७)

१०५६ याप्रमाणें राहणारा, स्मृतिमान्, अप्रमत्त आणि विद्वान् भिक्षु, ममत्व सोडून, याच लोकीं जन्म, जरा, शोक, परिदेव व दुःख यांचा त्याग करील. (८)

१०५७ महर्षीच्या या भाषणाचें मी अभिनंदन करतों. हे गोतमा, उपाधिरहित (निर्वाण) कसें असतें तें तूं उत्तम रीतीनें सांगितलेंस. हे भगवन्, तूं खात्रीनें दुःखाचा त्याग केलेला आहेस. कारण, हा धर्म तुला चांगला माहीत आहे.

पाली भाषेत :-

१०५८ चे चापि नून पजहेय्यु१(१ सी., म.-पजहेय्य.) दुक्खं। ये त्वं मुनि२(२ Fsb.- मुनी.)(३नि., अ., सी., रो.-अट्ठितं.)अट्ठिकं ओवदेय्य। 
तं तं नमस्सामि४(४-५ म.-नमस्सामनुसमेच्च.) समेच्च५ नाग। अप्पेव मं भगवा अट्ठिकं ओवदेय्य।।१०।।

१०५९ यं ब्राह्मणं वेदगुं आभिजञ्ञा६(६ सी.-आभिजञ्ञं; म., अ., नि.-अभिजञ्ञा, )। अकिञ्चनं कामभवे असत्तं।।
अद्धा ही सो ओघमिमं अतारि७(७ सी.-अतरि.)। तिण्णो च८(८सी., म.-व. ) पारं अखिलो अकंखो।।११।। 

मराठीत अनुवाद :-

१०५८ हे मुने, ज्या आस्तिकांना१ [१ मूळ- ‘अट्ठितं’ असाही पाठ आहे. टीकाकार या शब्दाचा अर्थं ‘सक्कच्चं (आस्थापूर्वक)’ किंवा ‘सदा’ (नेहमीं) असा देतो. ब्रह्मी पोथ्यांतून ‘अट्ठिकं’ असा पाठ आहे. त्याला अनुसरून येथें अर्थ दिला आहे. तो जास्त सयुक्तिक दिसतो.] तूं उपदेश करशील, तेही खात्रीनें दुःखाचा त्याग करतील. म्हणून, हे नागा, तुजपाशीं येऊन तुला मी नमस्कार करतों. हे भगवन्, तूं मला आस्तिकाला१ उपदेश करावा, हाच माझा उद्देश. (१०)

१०५९ (भगवान्-) जो ब्राह्मण वेदपारग, अकिंचन आणि कामभवांत अनासक्त असा जाणला गेला असेल, तोच हा ओघ खात्रीनें तरून जाईल; तोच काठिन्यरहित व शंकारहित, उत्तीर्ण आणि पार गेलेला, असें जाणावें.(११)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel