पाली भाषेत :-

१०६२ तेन हातप्पं करोहि (धोतका ति) इधेव निपको सतो।
इतो सुत्वान निग्घोसं। सिक्खे निब्बाणमत्तनो।।२।।

१०६३ पस्सामहं देवमनुस्सलोके। अकिञ्चनं ब्राह्मणं इरियमानं।
तं तं नमस्सामि समन्तचक्खु१ (१सी.-क्खुं.)। पमुञ्च मं सक्क कथंकथाहि।।३।।

१०६४ २(२ म.-नोहं.)नाहं गमिस्सामि३(३म.-सहिस्सामि, नि.-समीहामि.) पमोचनाय। ४(४सी., म.-कथी.)कथंकथिं घोतक ५(५म.-किंचि ।)कञ्चि लोके। 
धम्मं च सेट्ठं आजानमानो। एवं तुवं ओघमिमं तरेसि।।४।।

१०६५ अनुसास ६(६सी.-ब्रह्म.)ब्रह्मे करुणायमानो। विवेकधम्मं यमहं विजञ्ञं।
यथाहं आकासो व अब्यापज्जमानो७(७म., अ.- पज्झ, सी.- पज.)। इधेव सन्तो असितो ८(८सी., म.- य्य.)चरेय्यं।।५।। 

मराठीत अनुवाद :-

१०६२ असें जर आहे तर — हे धोतका, असें भगवान् म्हणाला - तूं कुशल आणि स्मृतिमान् होऊन हा माझा धर्म जाणण्याविषयीं खटपट कर. माझा उपदेश ऐकून तूं आपल्या निर्वाणाचा मार्ग शिकूं शकशील. (२)

१०६३. (धोतक -) देवमनुष्यलोकीं अकिंचन होऊन हिंडणार्‍या या ब्राह्मणाला मी पाहतों. हे समन्तचक्षु, त्या तुला मी नमस्कार करतों. हे शाक्या, मला माझ्या शंकांपासून सोडव. (३)

१०६४ (भगवन् -) हे धोतका, या जगांत कोणत्याही संशयग्रस्त माणसाची सोडवणूक करण्यासाठीं मी जात नसतों. तूं श्रेष्ठ धर्म जाणणारा हो. येणेंकरून तूं हा ओघ तरून जाशील. (४)

१०६५ (धोतक -) हे ब्रह्मन्, कृपा करून मी एकान्तवासधर्म जाणेन अशा रीतीनें मला उपदेश कर; जेणें - करून मी आकाशासारखा निर्द्वेष होऊन याच लोकीं शांत आणि अनाश्रित होऊन हिंडेन.(५)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel