पाली भाषेत :-

१०८१ ये केचि मे समणब्राह्मणासे (इच्चायस्मा नन्दो)। दिट्ठे सुतेनापि वदन्ति सुद्धिं।
सीलब्बतेनापि वदन्ति सुद्धिं। अनेकरूपेन वदन्ति १(१ म.- सुद्धि )सुद्धिं।
(२म.- ते चे,)सचे मुनि ब्रूसि अनोघतिण्णे। अथ को चरहि देवमनुस्सलोके।
अतारि जातिं च जरं च मारिस। पुच्छामि तं भगवा ब्रूसि मे तं।।५।।

१०८२ नाहं सब्बे समणब्राह्मणासे३(३सी., म - समणा.) (नन्दा ति भगवा) जातिजरा४ (४ Fsb. जाती.)निवुता ति ब्रूमि। 
येसीघ५( ५ म.- येऽपि ध ) दिट्ठं व सुतं मुतं वा। सीलब्बतं वाऽपि पहाय सब्बं।
अनेकरूपंऽपि पहाय सब्बं। तण्हं परिञ्ञाय अनासवासे ६(६ सी.- ये.)
ते वे ओघतिण्णा ति ब्रूमि।।६।।

मराठीत अनुवाद :-

१०८१ जे कोणी श्रमण आणि ब्राह्मण — असें आयुष्मान् नन्द म्हणाला — दृष्टीनें आणि श्रुतानें शुद्धि होते म्हणतात, शीलव्रतानें शुद्धि होते असें म्हणतात, किंवा दुसर्‍या अनेक उपायांनीं शुद्धि होते असें म्हणतात, ते जर, हे मुने, ओघतीर्ण नाहींत असें तूं म्हणतोस, तर मग, हे मारिषा, देवमनुष्यालोकीं जन्म आणि जरा कोण तरतो? हे भगवन्, हें मी तुला विचारतों, तें मला सांग (५)

१०८२ सर्वच श्रमण आणि ब्राह्मण — हे नन्दा, असें भगवान् म्हणाला — जन्मानें आणि जरेनें आच्छादले आहेत असें मी म्हणत नाहीं. जे या जगांत दृष्ट, श्रुत, अनुमित, सर्व प्रकारचें शीलव्रत आणि अनेकविध उपाय सोडून आणि सर्व प्रकारची तृष्णा जाणून अनाश्रव होतात, तेच जन ओघतीर्ण असें मी म्हणतों. (६)

पाली भाषेत :-


१०८३ एताभिनन्दामि वचो महेसिनो सुकित्तितं गोतमऽनूपधीकं।
येसीध दिट्ठं व...पे०...[१०८२]...अनासवासे
अहंऽपि ते ओघतिण्णा ति ब्रूमी ति।।७।।

नन्दमाणवपुच्छा निट्ठिता !

मराठीत अनुवाद :-


१०८३ महर्षींच्या या वचनाचें मी अभिनंदन करतों. हे गोतमा, जें अनुपाधिक (निर्वाण) तें तूं उत्तम रीतीनें सांगितलेंस. जे या जगांत दृष्ट, श्रुत, अनुमित, सर्व प्रकारचें शीलव्रत आणि अनेकविध उपाय सोडून आणि सर्व प्रकारची तृष्णा जाणून अनाश्रव होतात, ते जन ओघतीर्ण होत असें मीही म्हणतों. (७)

नन्दमाणवपुच्छा समाप्त
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel