पाली भाषेत :-
१०९१ निरासयो सो न सो आससानो। पञ्ञाणवा सो न च पञ्ञकप्पी।एवंऽपि तोदेय्य मुनिं विजान। अकिञ्चनं कामभवे असत्तं ति।।४।।
तोदेय्यमाणवपुच्छा निट्ठिता।
मराठीत अनुवाद :-
१०९१ हे तोदेय्या, तो आसक्तिरहित होतो, त्याच्या ठिकाणीं आसक्ति राहत नाहीं; तो प्रज्ञावान् होतो, प्रज्ञेची कल्पना करणारा नव्हे. येणेंप्रमाणें कामभवांत अनासक्त आणि अकिंचन मुनि असतो असें समज. (४)
तोदेय्यमाणवपुच्छा समाप्त
६५
[११. कप्पमाणवपुच्छा (१०)]
पाली भाषेत :-
१०९२ मज्झे सरस्मिं१ (१ म.-स्मि । तिट्ठतं (इच्चायस्मा कप्पो) ओघे२(२-२ म.-ओघजाते ।) २जाते महब्भये।
जरामच्चुपरेतानं दीपं पब्रूहि मारिस।
३(३म.-तं ।)त्वं च मे दीपमक्खाहि४(४सी., म.-दिसम ।) यथयिदं५(५ Fsb.-यथा यिदं.)
नापरं सिया।।१।।
६५
[११. कप्पमाणवपुच्छा (१०)]
मराठीत अनुवाद :-
१०९२ सररूपी (संसाराच्या) मध्यभागीं राहत असतां - असें आयुष्मान् कप्प म्हणाला - व भयंकर ओघ चालला असतां, हे मारिषा, जरामृत्यु - परायणासाठीं द्वीप कोणतें तें सांग. ज्या योगें हा (भव) पुन: येणार नाहीं असलें द्वीप सांग.(१)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.