पाली भाषेत :-

११४२ पस्सामि नं मनसा चक्खुना व१(१ म.- च.)। रत्तिंदिवं ब्राह्मण अप्पमत्तो।
नमस्समानो विवसेमि रत्तिं। तेनेव२(२ सी.- येनेव ) मञ्ञामि अविप्पवासं३( ३ म. -वासि. )।।१९।।

११४३ सद्धा च पीती च मनो सती च। नापेन्ति४(४ सी.- नापेत्त, म.-नामे किं. Fsb. नामेन्ति. ) मे गोतमसासनह्मा।
यं यं दिसं वजति भूरिपञ्ञो। स तेन तेनेव नतोऽहमस्मि।।२०।।

११४४ जिण्णस्स मे दुब्बलथामकस्स। तेनेव कायो न पलेति५ (५बु.-मगेति; पलेति.) तत्थ।
संकप्पयत्ताय६(६ सी.,- यन्ताय. ) वजामि निच्चं। मनो हि मे ब्राह्मण तेन युत्तो।।२१।।

११४५ पंके सयानो७ (७ Fsb. [सयानो ].)परिफन्दमानो । दीपा दीपं उपप्लविं८( ८म.-उपल्लविं, सी.-उप्पलविं.)
अथऽद्दसासिं संबुद्धं । ओघतिण्णमनासवं।।२२।।

मराठीत अनुवाद :-

११४२ त्याला मी रात्रंदिवस, अप्रमत्त होऊन, डोळयानें पहावें तद्वत्, मनानें पाहतों, त्याला नमस्कार करून मी रात्र घालवतों, आणि त्यायोगें मी त्याच्या सहवासांत आहें असें समजतों. (१९)

११४३ माझी श्रद्धा, प्रीति, मन आणि स्मृति गोतमाच्या उपदेशापासून अलग होत नाहींत. ज्या ज्या दिशेला तो विपुलप्रज्ञ जातो त्या त्या दिशेनें मी नत होतों. (२०)

११४४ मी वृध्द आणि बलहीन झाल्याकारणानें माझा देह त्या दिशेला जाऊं शकत नाहीं; पण माझी संकल्पयात्रा तेथें नित्य होतें. कांकीं, हें ब्राह्मणा, माझें मन तेथें जडलें आहे. (२१)

११४५ मी चिखलांत पडून तडफडत होतों व एका द्वीपापासून दुसर्‍या द्वीपाला वाहून जात होतों. इतक्यांत ओघतीर्ण, अनाश्रव संबुध्दास मीं पाहिलें. (२२)

पाली भाषेत :-

११४६ यथा अहू वक्कलि मुत्तसद्धो। भद्रावुधो आळविगोतमो च।
एवमेव१(म.-१ एवं त्वं.) त्वंऽपि पमुञ्चस्सु२( २म.-पमुच्चसु, सी., Fsb.-पमुञ्चयस्सु) सद्धं। गमिस्ससि ३( ३ Fsb.[त्वं] )त्वं पिंगिय मच्चुधेय्यपारं४(४म.-मुच्चुधेय्यस्स पारं) ।।२३।।

११४७ एस भिय्यो पसीदामि सुत्वान मुनिनो वचो।
विवत्तच्छद्दो५( ५म.-विवट्ट) संबुद्धो अखिलो पटिभानवा६( ६सी., म.-भाणवा.)।।२४।।

११४८ अधिदेवे अभिञ्ञाय सब्बं वेदि परोवरं।
पञ्हानन्तकरो सत्था कंखीनं पटिजानतं७( ७सी.-परिजानकं.)।।२५।।

मराठीत अनुवाद :-

११४६ “वक्कलि, भद्रावुध, आणि आळविगोतम हे जसे मोठे श्रद्धावान् झाले तसा, हे पिंगिया, तूंही श्रद्धावान् हो. येणेंकरून तूं मृत्युध्येयाच्या पार जाशील.” (२३)

११४७ हें मुनीचें वचन ऐकून माझें मन आणखीही प्रसन्न झालें. अविद्येचें आवरण दूर सारणारा, काठिन्यरहित आणि प्रतिभाशाली संबुद्ध, (२४)

११४८ अधिदेवांना आणि सर्व उच्चनीच भावांना जो जाणतो, आणि आपणांस संशयग्रस्त म्हणविणार्‍या माणसांच्या प्रश्नांचा (योग्य उत्तरें देऊन) निकाल लावणारा जो, तो शास्ता (गुरु) आहे. (२५)

पाली भाषेत :-

११४९ असंहीरं असंकुप्पं यस्स नत्थि उपमा क्वचि।
अद्धा गमिस्सामि न मे त्थ कंखा। एवं मं१(१-१ म.-, Fsb.- पधारेहि, सी.-धारेहि.) १धारोहि अधिमुत्तचित्तं२( २ सी.-Fsb. म.,- अवित्तचित्तं.) ति।।२६।।


[पारायणसुत्तं निट्ठितं] 

पारायणवग्गो निट्ठितो।

निट्ठितो सुत्तनिपातो

अट्ठभाणवारपरिमाणाय पाळिया।

मराठीत अनुवाद :-


११४९ अहार्य, असंकोप्य आणि अनुपम, अशा निर्वाणाला मी खात्रीनें जाईन, त्यांत मला शंका नाहीं. अशा रीतीनें मी (श्रद्धेनें) विमुक्तचित्त आहे असें समज. (२६)

[पारायणसुत्तं समाप्त]

पारायणवग्ग समाप्त

पाठांतराचे आठ विभाग असलेली
सुत्तनिपात-संहिता समाप्त.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel