२०२. छत्री हातांत असलेल्या निरोगी माणसाला धर्मोपदेश करणार नाहीं, असा नेम करावा ।।५७।।
२०३. कांठी हातांत असलेल्या निरोगी माणसाला धर्मोपदेश करणान नाहीं, असा नेम करावा ।।५८।।
२०४. तलवार हातांत असलेल्या निरोगी माणसाला धर्मोपदेश करणान नाहीं, असा नेम करावा ।।५९।।
२०५. आयुध (धनुष्य वगैरे) हातांत असलेल्या निरोगी माणसाला धर्मोपदेश करणान नाहीं, असा नेम करावा ।।६०।।
२०६. पादुका घातलेल्या निरोगी माणसाला धर्मोपदेश करणार नाहीं, असा नेम करावा ।।६१।।
२०७. वाहाणा घातलेल्या निरोगी माणसाला धर्मोपदेश करणार नाहीं, असा नेम करावा ।।६२।।
२०८. वाहनावर बसलेल्या निरोगी माणसाला धर्मोपदेश करणार नाहीं, असा नेम करावा ।।६३।
२०९. बिछान्यांत असलेल्या निरोगी माणसाला धर्मोपदेश करणार नाहीं, असा नेम करावा ।।६४।।
२१०. पल्लित्थिकेवर बसलेल्या निरोगी माणसाला धर्मोपदेश करणार नाहीं, असा नेम करावा ।।६५।।
२११. डोक्याला वस्त्र गुंडाळलेल्या निरोगी माणसाला धर्मोपदेश करणान नाहीं, असा नेम करावा ।।६६।।
२१२. डोक्यावरून पांघरूण घेतलेल्या निरोगी माणसाला धर्मोपदेश करणार नाहीं, असा नेम करावा ।।६७।।
२१३. आपण जमिनीवर बसून आसनावर बसलेल्या निरोगी माणसाला धर्मोपदेश करणार नाहीं, असा नेम करावा ।।६८।।
२१४. आपण नीच आसनावर बसून उच्च आसनावर बसलेल्या निरोगी माणसाला धर्मोपदेश करणार नाहीं, असा नेम करावा ।।६९।।
२१५. आपण उभें राहून बसलेल्या निरोगी माणसाला धर्मोपदेश करणार नाहीं, असा नेम करावा ।।७०।।
२१६. आपण मागून जात असतां पुढें जाणार्‍या निरोगी माणसाला धर्मोपदेश करणार नाहीं, असा नेम करावा ।।७१।।
२१७. आपण मार्गाबाहेर चालत असतां मार्गांतून चालणार्‍या निरोगी माणसाला धर्मोपदेश करणार नाहीं, असा नेम करावा ।।७२।।

{वरील सोळा नियम धर्मोपदेशविषयक आहेत.}


२१८. आजारी नसतां उभ्यानें शौचविधि किंवा लघ्वी करणार नाहीं, असा नेम करावा ।।७३।।
२१९. गवत वाढलेल्या ठिकाणीं आजारीं नसतां शौचविधि किंवा लघ्वी करणार नाहीं, असा नेम करावा ।।७४।।
२२०. आजारी नसतां पाण्यांत शौचविधि किंवा लघ्वी करणार नाहीं, असा नेम करावा ।।७५।।

सात अधिकरणसमय

संघांत उत्पन्न झालेल्या तंट्याची शांति आणि तडजोड करण्यासाठीं:-
२२१. सन्मुखविनय द्यावा; (१)
२२२. स्मृतिविनय द्यावा;  (२)
२२३. अमूढविनय द्यावा; (३)
२२४. प्रतिज्ञातकरण करावें; (४)
२२५. बहुमताने निकाल करावा; (५)
२२६. ज्याचें पाप त्याला विधि करावा; (६)
२२७. तृणावस्तार विधि करावा. (७)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel