विडूडभ कपिलवस्तूला गेल्यावर शाक्यांनी त्याचें यथायोग्य आदरातिथ्य केलें. “हा तुझा मामा, हा तुझा आजोबा, हा तुझा चुलतमामा,” असे म्हणून त्याला महानाम वगैरे वडील माणसांनां नमस्कार करावयाला लाविलें पण विडूडभानें “आपल्यापेक्षां वयानें लहान मंडळी कोणीच नाहीं की काय?” असा जेव्हा प्रश्न केला, तेव्हा ते शिकारीसाठी बाहेर गांवी गेले आहेत, असें त्याला उत्तर मिळालें.
आपल्या आजोबाच्या घरीं काही दिवस राहून विडूडभ जेव्हा श्रावस्तीला परत जाण्यास निघाला, तेव्हां शाक्यांनी आपल्या संथागारांत (नगर मंदिरात) जमून त्याचा योग्य सन्मान केला. विडूडभ कांही अंतरावर गेल्यावर त्याचा एक नोकर, कांही सामान विसरलें होतें तें नेण्यासाठी म्हणून माघारा आला असतां संथागाराजवळ पुढील संवाद त्याच्या कानीं आला.
एक दासी म्हणते “अग ए! तो दासीपुत्र बसलेला पाट निराळा काढून ठेव बरं!”
यावर दुसरी दासी म्हणते “अग, तो दासीपुत्र तो कोण?”
“वा:! तूं तर अगदींच वेडी दिसतेस. अग, तो आपला विडूडभ दासीचा मुलगा आहे, हें तुला माहीत नाही काय? अग, त्याचा तो पाट घेऊन पाण्यानें साफ धुऊन टाक!”
त्या नोकरानें हे वर्तमान विडूडभाच्या संवगड्यानां सांगितलें, व त्यांनीं तें विडूडभाला सांगितलें. ते ऐकून विडूडभ अत्यंत त्वेषानें आपल्या मनाशींच म्हणाला “मी बसलों होतों तो पाट शाक्यराजे पाण्यानें धुवावयाला लावतात काय! मला जर दैवयोगानें राज्यपद मिळालें, तर तोच पाट मी शाक्यांच्या रक्तानें धुवावयाला लावीन!”
पसेनदिराजाला देखील वासभक्षत्रिया शाक्यकुलांतील नसून दासीकन्या आहे ही बातमी समजली, आणि त्यानें तिला पट्टराणीच्या पदावरून दूर केलें.
कांही दिवसांनी बुद्धगुरू राजवाड्यांत गेला असतां राजानें घडलेली गोष्ट त्याला सांगितली. तेव्हा तो म्हणाला “महाराज, शाक्यांनीं अयुक्त आचरण केलें, त्यांत संशय नाहीं. परंतु वासभक्षत्रियेचा आपण स्वीकार केलात, त्याअर्थी तिला एवढ्याच गोष्टीवरून पट्टराणीपदावरून दूर करणें चांगले नाहीं. तिची आई जरी दासी असली, तरी बाप क्षत्रियच आहे, व आपल्याबरोबर ती अभिषिक्त झाली आहे, हें आपण विसरतां कामा नये.”
बुद्धाचें म्हणणें राजाला पटलें व वासभक्षत्रियेला पूर्वीचाच मान पुन:देण्यास त्यानें हुकूम केला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.