संघ
(भाग २ रा)


बुद्ध भगवंताच्या ह्यातीतच त्याचा धर्म मध्यदेशातं२ (२ पूर्वेस भागलपुर, पश्चिमेस गांधार, उत्तरेस हिमालय आणि दक्षिणेस विंध्यपर्वत यांच्यामधील प्रदेशास मध्यप्रदेश म्हणत असत.) चोहोंकडें पसरला होता. बौद्ध भिक्षु विशेषत: संभाषणाच्या द्वारें धर्मप्रसार करीत असत. आजकालच्या प्रमाणें सभा भरवून तें व्याख्याने देत नसत. जेथें जेथें धर्मश्रवण करणार्या व्यक्ति- मग ती एक असो किंवा अनेक असोत- त्यांना भेटत, तेथें तेथें ते त्यांना उपदेश करीत. लोकांशीं त्यांची वर्तणूक कशा रीतीची होती, हें पूर्ण भिक्षूच्या पुढील गोष्टींवरून वाचकांच्या चांगलें लक्षात येण्यासारखं आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(१ बुद्ध भगवंताच्या परिनिर्वाणानंतर अशोक राजाच्या कारकीर्दीपर्यंत संघाची संक्षिप्त माहिती वाचकांसमोर ठेवण्याच्या उद्देशाने हा भाग मूळ व्याख्यानास जोडला आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पूर्ण नांवाचा बुद्धाचा एक शिष्य होता. तो एके दिवशी बुद्ध भगवंतापाशी आला, आणि आपणास संक्षेपानें धर्मोपदेश करावा, अशी त्यानें त्याला विनंती केली. उपदेश संपल्यावर बुद्ध भगवान् म्हणाला:- पूर्णा, आतां तूं कोणत्या प्रदेशास जाणार आहेस?

पूर्ण- भगवन्, या आपल्या उपदेशाचें ग्रहण करून मी आतां सुनापरंत नांवाच्या प्रदेशास जाणार आहें.

बुद्ध- पूर्णा, सुनापरंत प्रांतांतील लोक मोठे कठोर आहेत; मोठे क्रूर आहेत; ते जर तुला शिव्या देतील, तुझी निंदा करितील, तर
तुला त्या वेळीं काय वाटेल?

पूर्ण- त्या वेळीं, हे भगवन्, हे लोक फार चांगले आहेत; कारण यांनी माझ्यावर हातानें प्रहार केले नाहींत, असें मला वाटेल.

बुद्ध- आणि जर त्यांनीं तुझ्यावर हातानें प्रहार केला तर?

पूर्ण- मला त्यांनीं दगडांनीं मारलें नाहीं म्हणून ते लोक चांगलेच आहेत असें मी समजेन.

बुद्ध- आणि दगडांनी मारलें तर?

पूर्ण- माझ्यावर त्यांनीं दंडप्रहार केला नाहीं म्हणून ते फार चांगले लोक आहेत असें मी मानीन.

बुद्ध-
आणि दंडप्रहार केला तर?

पूर्ण-
शस्त्रप्रहार केला नाहीं, हा त्यांचा चांगुलपणा आहे असें मी समजेन.

बुद्ध- आणि शस्त्रप्रहार केला तर?

पूर्ण- मला ठार मारलें नाहीं, हा त्यांचा चांगुलपणा आहे, असें मी समजेन.

बुद्ध- आणि तुला ठार मारलें तर?
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to बुद्ध, धर्म आणि संघ


मुगल-ए-आजम
कौटुंबिक प्रेमकथा भाग १
बौद्धसंघाचा परिचय
मोहम्मद आयशाचे शापित जहाज
गौतम बुद्ध
भिंतींना कान असतात ?
हाक काळजाची
संताच्या जीवनातील प्रेरक प्रसंग -भाग पहिला
त्या वळणावरचा पाऊस
दु:खी
कल्पनारम्य कथा भाग १
किनारा
महाभारतातील विस्मृतीत गेलेल्या कथा
गावांतल्या गजाली
मृत्यूच्या घट्ट मिठीत