सोडूनी दिल्या साऱ्या
जुन्याट पाऊल वाटा,
घुटमळलो बघून त्या
भूलव्या रानवाटा .....
चालण्यास त्यावर मी
लावला होता सपाटा,
अलगद कधी तळव्यात
नकळत घुसला काटा....
झाल्या मोकळ्या मग
रक्ताच्याही वाटा,
अमाप दुःख सांडलं
जेव्हा भारून गेले वाटा ...
भारणारा नव्हता कुणी
होता आपलाच भामटा,
हळूच सोडून गेला
वळणावरती काटा.....
संजय सावळे
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.