आफ्रिकेमध्ये झालेल्या विध्वंसामुळे संपुर्ण जग शोकाकूळ होतं. संपुर्ण मानवजातीवर झालेला सर्वांत भयानक हल्ला म्हणून त्याच्याकडे बघितलं जात होतं. २ तासांत ३,००,००० पेक्षा जास्त सैनिक मृत्यूमूखी पडले होते. जग त्या दिवसाकडे काळा दिवस म्हणून बघत होतं. कुणी येशुकडे तर कुणी देवाकडे प्रार्थना करत होतं, कुणी मशीदमध्ये तर कुणी गुरुद्वारामध्ये जात होतं. जो तो मानवजातीच्या रक्षणासाठी प्रार्थना करत होतं.

दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही पत्रकार मोठ्या धाडसाने अग्निपुत्राची मुलाखत घेण्यासाठी जातात. विशेष म्हणजे तो सर्वांना मुलाखत देण्यासाठी तयार होतो.

“बोला.” अग्निपुत्र म्हणतो.

“मनुष्यप्राण्याशी आपलं असं कोणतं वैर आहे की आपण संपुर्ण मुनष्य प्राण्याचा अंत करायला निघाला आहात?” एक पत्रकार

“मनुष्य प्राण्याशी माझं कोणतंही वैर नाही. पण माझा जन्म मनुष्य प्राण्याचा अंत करण्यासाठी झाला आहे.” अग्निपुत्र म्हणतो.

“पण असं काय कारण आहे की आपण मनुष्य प्राण्याला नाश करायला निघाला आहात?” दुसरा पत्रकार

“कारण हे की तो मनुष्य प्राणी आहे, ४,००० वर्षांपुर्वी काही मनुष्यांनी यज्ञ करुन मनुष्यजातीच्या रक्षणासाठी माझी निर्मिती केली होती. नियमाप्रमाणे १०० मनुष्यांचा बळी द्यावयाचा होता, १०० पेक्षा एका मनुष्याचा देखील जास्त बळी गेला तर हा रक्षकच भक्षक होईल असा तो यज्ञ होता. पण तुम्हा मुर्ख मनुष्य प्राण्यांनी १०० ऐवजी १०७ बळी दिले आणि माझे ध्येय मनुष्य प्राण्याचे रक्षण करण्याऐवजी त्याचा नाश करणे असे झाले.” अग्निपुत्राने खुलासा केला.

“४,००० वर्षांपुर्वी झालेल्या चुकीची शिक्षा तुम्ही आता कशाला देता? त्या वेळी ज्या लोकांनी चुक केली होती ते सर्व आता मृत्यूमूखी पडले आहेत. आपण आमच्याशी सामंजस्याने या पृथ्वीतलावर राहू शकता.” तिसरा पत्रकार.

“ते कदापी शक्य नाही.” अग्निपुत्र चवताळतो.

“कृपया चिडू नका. आमची आपणांस विनंती आहे, कृपया स्त्रीया आणि लहान मुलांना अभय द्या.” चैथा पत्रकार.

“मनुष्य प्राण्याचा आता पृथ्वीवरचा वावर संपला आहे. माझ्या निर्मितीचा यज्ञ स्वतः मनुष्याने केला होता. त्याने स्वतः मुर्खपणा करुन स्वतःवर हे संकट ओढवले आहे. मनुष्याचा नाश निश्चित आहे.” एवढं बोलून तो पुढे चालू लागतो. त्याची मुलाखत आणि वृत्तवाहिन्यांसमोरील हे विधान संपुर्ण जगभरातील लोक पाहत असतात.

अग्निपुत्र आता आफ्रिकेजवळून समुद्रकिनारी आला होता. सर्व आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांचे हेलिकॉप्टर त्याच्यावर नजर ठेवून होते. अग्निपुत्र एक नजर त्या सर्वांवर टाकतो आणि विद्रुप हास्य करत तो समुद्राखाली जातो.

“आपण पाहू ‘ाकता, ज्वालांनी भरलेला अग्निपुत्र नावाचा दानव पुन्हा एकदा समुद्राच्या खालून जात आहे. विशेष म्हणजे पाण्यामध्ये जाऊन देखील त्याच्या शरीराच्या तापमानामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल आपल्याला दिसून येत नाही.” एक वृत्तवाहिनी

“सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार हा दानव आता बम्र्युडा त्रिकोणाच्या दिशेने जात आहे. बम्र्युडा त्रिकोणमध्ये गेलेली एकही व्यक्ती आतापर्यंत पुन्हा आलेली नाही, अशा ठिकाणी जाऊन अग्निपुत्र पुन्हा येईल का? आमच्यासोबत सदैव अपडेट रहा” दुसरी वृत्तवाहिनी

“अग्निपुत्राने हे निश्चित केले आहे की तो मनुष्य प्राण्याचा नाश करुनच राहिल. 20 अब्जापेक्षा जास्त लोक एकत्र येऊन अग्निपुत्राचा एकत्र सामना करु शकतील का? असं कोणतं शस्त्र आहे ज्याने अग्निपुत्राचा नाश होऊ शकेल?” तिसरी वृत्तवाहिनी

“हिंदू पंडितांच्या मते, मनुष्याने आतापर्यंत इतकी पापं केली आहेत की, त्याच्या पापांचा घडा आता भरुन वाहतो आहे, आणि म्हणूनच त्याचा नाश करण्यासाठी देवाने अग्निपुत्राला पृथ्वीवर पाठवले आहे. अग्निपुत्र स्वतः म्हणाला होता की, त्याचा जन्म हा यज्ञातून झाला होता, म्हणजेच अग्निपुत्र हा हिंदू धर्मातून निर्माण झाला आहे. हिंदू धर्माची शक्ती आता आपण पाहिली असून त्याच्या कोपाला सामोरे जा, असे वक्तव्य प्रसिध्द पंडीत सुर्यतेजस्वामी यांनी केलं आहे.” चैथी वृत्तवाहिनी

फेसबूक, व्हॉट्सअप, ट्वीटर आणि सर्व सोशल साईट्सवर इतर कोणत्याही विषयांऐवजी अग्निपुत्र हा एकच विषय सुरु होता. अग्निपुत्राला मारण्यासाठी जो कूणी योग्य उपाय सुचवेल त्याला भरघोस इनाम देण्यात येईल अशा प्रकारचे एक वेगळे संकेतस्थळ चीन सरकार सुरु करते. ज्यामधले दोन उपाय सर्वांना पटतात. त्यातील पहिला उपाय असा होता की,

अग्निपुत्राला उडता येत नाही आणि पोहता देखील येत नाही. तो फक्त पाण्याखालून चालू ‘ाकतो. अशा वेळी त्याची दिशाभूल करुन त्याला एखाद्या शक्तिशाली रॉकेटमध्ये न्यायचं. तो आतमध्ये शिरताच ताबडतोब ते रॉकेट आकाशात सोडून द्यायचं, म्हणजे तो पृथ्वीपासून दूर जाईल.

दुसरा उपाय असा होता की, ज्या पद्धतीने यज्ञ करुन अग्निपुत्राचा जन्म झाला आहे. त्याच पद्धतीने यज्ञ करुन अशा शक्तीला जन्म द्यायचा जी मनुष्याच्या रक्षणासाठी त्याचा सामना करु शकेल.

चीन सरकारने दोन्ही उपाय मंजूर केले. अग्निपुत्राला अवकाशात सोडायचे आणि जर तो अवकाशातून पृथ्वीवर पुन्हा आला तर, त्याचा सामना करण्यासाठी आणखी एक अग्निपुत्र असेल.

संपुर्ण जगाला एकाच गोष्टीची भिती होती, ती म्हणजे अग्निपुत्र मनुष्याचा नाश करेल, त्यामुळे चीन सरकारच्या या निर्णयानुसार जाण्याचं सर्वांनी ठरवलं. अग्निपुत्र अमेरिकेजवळील बेटांपर्यंत पोहोचला होता. त्या ठिकाणी अमेरिकन सैन्याचे एक रॉकेट अवकाशात उड्डाण घेण्यासाठी आधीच तयार असल्याने त्याच रॉकेटने अग्निपुत्राला पृथ्वीबाहेर नेण्याचं ठरवलं जातं. रॉकेट उडवण्याच्या सर्व गोष्टी पुर्ण होतात. अग्निपुत्र समुद्रातून त्या बेटाच्या काठाशी येतो, तिथे सैनिकांकडून त्याची दिशाभूल केली जाते आणि नकळत रॉकेटमध्ये त्याचा प्रवेश होतो. अग्निपुत्राला काही कळणार तोवर रॉकेट उड्डाण करतं. हा सर्व घटनाक्रम सर्व वृत्तवाहिन्यांवर थेट दाखवण्यात येत होता, रॉकेट उड्डाण करताच संपुर्ण जगभर एकच जल्लोष होतो. सगळीकडे आनंदोत्सव साजरा होतो, सगळे आकाशाकडे बघून टाळ्या वाजवतात, सर्व देशांचे सैन्यदल खुश होतात.

“एकदा का हा रॉकेट पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर गेला, की याचा बापसुध्दा आपलं काही वाकडं करु शकणार नाही.” रडारवर त्या रॉकेटची माहिती घेणारा एक इंजिनियर म्हणतो. रॉकेट पृथ्वीच्या कक्षाच्या बाहेर जाऊ लागतं, थोडं अंतर बाकी असतं तेच त्या रॉकेटचा स्फोट होतो. अग्निपुत्रानेत त्या रॉकेटचा स्फोट केला असतो. रॉकेटचे तुकडे आकाशातून आॅस्ट्रेलियाजवळच्या समुद्रात पडतात आणि नेमका तिथेच अग्निपुत्रदेखील पडतो. त्याला कसलीही इजा होत नाही.

आता मात्र तो बम्र्युडा त्रिकोणापासून खुप दुर आला होता, मनुष्याने त्याच्याविरुध्द आखलेला हा कट त्याच्या लक्षात येतो. तो प्रचंड क्रोधीत होतो. पण त्याचं पहिलं लक्ष्य अभिजीतला मारनं असतं म्हणून तो त्या गोष्टी बाजूला ठेवून बम्र्युडाच्या दिशेने निघतो.

त्याच्या पृथ्वीवर पुन्हा येण्याने संपुर्ण जग पुन्हा चिंताग्रस्त होतं. आता आपला मृत्यू निश्चित आहे या विचाराने अनेकांना रडू कोसळतं, तेव्हा भारतातील एक महान संशोधक सर्वांना दिलासा देण्यासाठी म्हणतात,

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृहाम्यहम् ।।
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ।।

(क्रमशः)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel